भारतीय कनिष्ठ हॉकी संघाचे नेतृत्व अनमोल एक्काकडे
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
आगामी बेल्जियम दौऱ्यासाठी भारतीय कनिष्ठ 21 वर्षांखालील वयोगटाच्या पुरूषांच्या हॉकी संघाचे नेतृत्व बचावफळीतील अनमोल एक्काकडे सोपविण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी 22 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. भारतीय कनिष्ठ हॉकी संघ 5 ते 18 जुलै दरम्यान बेल्जियमच्या दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात भारताचे ऑस्ट्रियाबरोबर सामने 7 आणि 8 जुलैला होतील. तर भारत आणि यजमान बेल्जियम यांच्यातील सामना 10 जुलैला तसेच भारत आणि जर्मनी यांच्यातील सामना 13 जुलैला खेळविला जाईल. भारत आणि बेल्जियम यांच्यातील सामना 14 जुलैला होणार असून या दौऱ्यातील शेवटचा भारताचा सामना नेदरलँड्सबरोबर 17 जुलैला खेळविला जाणार आहे.
भारती कनिष्ठ हॉकी संघ : गोलरक्षक-विवेक लाक्रा, कुणाल तेवातिया, बचावफळी-अनमोल एक्का (कर्णधार), रोहीत कुल्लू, चिराग, रवींदर, प्रशांत बार्ला, संजीत तिर्की, व्ही. मणीमारण, मध्यफळी-अद्रोहीत एक्का, हरपाल, जीतपाल, मुकेश टोप्पो, मनु मलिक, रितीक लाक्रा, आघाडीफळी-अजीत यादव, प्रभदीपसिंग, अर्जुन हरगुडे, आर्यन झेस, लवनूर सिंग, मोहम्मद डाड आणि गुरुसेवक सिंग.