कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओटवणे येथील अंकुश गांवकर यांचे निधन

04:18 PM Oct 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

ओटवणे |प्रतिनिधी
मूळचे ओटवणे गावठणवाडी येथील रहिवासी आणि सध्या मुंबईत खार पूर्व साईबाबा रोड जवाहर नगर येथे राहणारे अंकुश शंभा गांवकर (६५) यांचे शनिवारी सकाळी केईएममध्ये हॉस्पिटलमध्ये निधन झाले. या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चे कार्याध्यक्ष गणपत गावकर, सरचिटणीस रामचंद्र गावकर तसेच पांडुरंग गावकर, अनिल गावकर, उमेश गावकर आदींसह ओटवणे गावातील चाकरमान्यांनी धाव घेत गावकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. सायंकाळी त्यांच्यावर बांद्रा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अंकुश गावकर मालाड येथील प्रिंटिंग प्रेसमधील सोलना मशीनचे उत्कृष्ट ऑपरेटर होते. तसेच गायनाचीही त्यांना आवड होती. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, बहिण, भाऊ, भावजय, भावोजी, नातवंडे असा परिवार आहे. अभिजीत गावकर यांचे ते वडील तर ओटवणे येथील मूर्तिकार सुभाष गावकर यांचे ते भाऊ तसेच ओटवणे सरपंच आत्माराम गावकर यांचे ते सख्खे चुलत भाऊ होत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article