For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पदार्पणासाठी सज्ज अंजिनी

06:28 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
पदार्पणासाठी सज्ज अंजिनी
Advertisement

बिन्नी अँड फॅमिलीचे पोस्टर जारी

Advertisement

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनची पुतणी अंजिनी धवन ‘बिन्नी अँड फॅमिली’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. एकता कपूर यांच्या बालाजी मोशन पिक्चर्सकडून निर्मित आणि संजय त्रिपाठीकडून दिग्दर्शित हा चित्रपट एक फॅमिली ड्रामा आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाचे पहिले पोस्टर जारी केले आहे. तसेच याच्या प्रदर्शनाची तारीखही उघड केली आहे.

जुन्या काळातील संस्कार विरुद्ध सद्यकाळातील आधुनिक विचार, जटिलतांनी भरलेली आहे बिन्नीची फॅमिली, परंतु ही कहाणी आहे आम्हा सर्वांची, बिन्नी अँड फॅमिलीला भेटा 30 ऑगस्ट रोजी’ असे बालाजी मोशन पिक्चर्सकडून पोस्टरच्या कॅप्शनदाखल नमूद करण्यात आले आहे.

Advertisement

हा चित्रपट आंबटगोड कहाणद्वारे प्रेक्षकांची मने जिंकण्यास तयार आहे. अंजिनी धवनसोबत या चित्रपटात दिग्गज अभिनेता पंकज कपूर, हिमानी शिवपुरी, र ाजेश कुमार, चारू शंकर आणि अन्य कलाकार दिसून येणार आहेत. अंजिनी ही अभिनेता अनिल धवन यांची नात आणि सिद्धार्थ धवन यांची मुलगी आहे. अभिनयाच्या जगतात पाऊल ठेवण्यापूर्वी अंजिनीने ‘कुली नंबर 1’ या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे.

Advertisement
Tags :

.