‘अमृता शेरगिल’च्या व्यक्तिरेखेत अंजली शिवरामन
कोबाल्ट ब्ल्यू चित्रपट अन् क्लास वेबसीरिजमधील अभिनेत्री अंजली शिवरामन आगामी चित्रपटात ‘अमरी’ ही भूमिका साकारणार आहे. भारतीय अमेरिकन फिल्ममेकर मीरा नायर यांच्या चित्रपटात अंजली ही चित्रकार अमृता शेरगिल यांच्या व्यक्तिरेखेत दिसून येणार आहे.
अंजलीला हे काम ऑडिशनद्वारे मिळाले आहे. ऑडिशन कलाकाराच्या प्रवासाचा महत्त्वाचा हिस्सा आहे. मी मागील 5 वर्षांपासून ऑडिशन देत आहे. कलाकार म्हणून काम सुरू करतो, तेव्हा तो खूपच मोठा काळ असतो. माझा मागील शो यशस्वी ठरला होता, परंतु टाइपकास्ट होऊ नये म्हणून आम्हाला अधिक मेहनत करावी लागली. अशास्थितीत ऑडिशन यातून बाहेर पडण्याचे एक मोठे माध्यम असते. तुम्ही एकप्रकारच्या स्टारडमपर्यंत पोहोचत नाही तोवर ऑडिशनचे सत्र चालत राहते असे अंजलीचे सांगणे आहे.
मीरा नायर यांच्या चित्रपटामुळे अंजलीला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करता येणार आहे. हॉलिवूडमध्ये काम करणार असे मी कारकीर्दीच्या प्रारंभापासून म्हणत आहे. तेथेपर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागणार हे मला ठाऊक नाही, कारण माझ्याकडे चित्रपटसृष्टीत कुणीच गॉडफादर नाही, परंतु माझ्यात हिंमत अन् मेहनत करण्याची वृत्ती आहे, याचमुळे माझे ते स्वप्न सत्य होईल असे अंजलीने म्हटले आहे.