For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार मतदारसंघातून अंजली निंबाळकर विजयी होतील

11:12 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार मतदारसंघातून अंजली निंबाळकर विजयी होतील
Advertisement

आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी पत्रकार परिषदेतील मुलाखतीत व्यक्त केला विश्वास

Advertisement

वार्ताहर /नंदगड

राज्यातील काँग्रेस सरकारने पाच गॅरंटी योजना प्रभावीपणे राबवून महिला, युवकांसह जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे राज्यात काँग्रेसच्या 20 ते 22 जागा निवडून येणार आहेत. कारवार लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेसच्या उमेदवार अनुभवी, कर्तव्यदक्ष व जनतेच्या समस्या शासनदरबारी मांडण्यात तरबेज आहेत. आपण कारवार लोकसभा मतदारसंघाचा प्रचार दौरा पूर्ण केला असून यामध्ये जनतेचा प्रतिसाद पाहिल्यास अंजली निंबाळकर या मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा ठाम विश्वास माजी मंत्री व हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे यानी हल्याळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेतील मुलाखतीत व्यक्त केला. काँग्रेसने या निवडणुकीत सहा महिलांना उमेदवार म्हणून उतरले आहे. त्यापैकीच एक कारवार (कॅनरा) लोकसभा मतदारसंघाच्या अंजली निंबाळकर या होत. यापूर्वी या मतदारसंघात मार्गारेट अल्वा या महिला निवडून आल्या होत्या. कारवार लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसची संघटना मजबूत आहे. शिवाय या ठिकाणी पाच आमदार आहेत. काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते एकजुटीने काम करत आहेत. गेल्या 50 वर्षातील माझा राजकीय अनुभव पाहता. यावेळी काँग्रेसच्या निंबाळकरांचा विजयाचा मार्ग सुखकर झाला आहे.

Advertisement

देशातील व राज्यातील भाजप पक्ष व सरकारबद्दल आपलं मत काय?

यापूर्वी या ठिकाणी भाजपचे सहावेळा खासदार निवडून आले. त्यांनी साधे तोंडही दाखवले नाही. त्यामुळे भाजपाबद्दल लोकांच्यात मोठी नाराजी आहे. यापूर्वी भाजपाचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिवर्षी 2 कोटी युवकांना उद्योग देणार असल्याचे आश्वासन दिले होते. गेल्या दहा वर्षात त्यांनी 20 कोटी युवकांना रोजगार देणे आवश्यक होते. परंतु त्यांनी कोणालाही उद्योग उपलब्ध करून दिलेला नाही. त्यामुळे युवकांमध्ये असंतोष पसरला आहे. कारवार मतदार संघात काँग्रेस आणि भाजपामध्ये सरळ लढत आहे. गेले सहावेळा भाजपचे खासदार येथे निवडून आले. त्यांनी खानापूरसाठी काय केले, असा प्रतिप्रश्न देशपांडे यांनी केला.

निवडणुकीत काँग्रेसचा जाहीरनामा काय राहणार?

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न प्रामुख्याने करण्यात आला आहे. युवा न्याय अंतर्गत  केंद्र सरकारमध्ये रिक्त असलेल्या 30 लाख जागा भरण्यात येणार आहेत. प्रत्येक निरुद्योगी युवकाला वर्षाला 1 लाख रुपये देण्यात येणार आहेत. नारी न्याय अंतर्गत प्रत्येक महिलेला महालक्ष्मी योजनेतून 1 लाख रुपये देण्यात येणार आहे. महिलांना केंद्र सरकारच्या उद्योगांमध्ये 50 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. स्त्रियांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकार मैत्री म्हणून एक जागा भरण्यात येणार आहे. अंगणवाडी कार्यकर्त्यांना दुप्पट मानधन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ केले जाणार असून शेतकऱ्यांच्या उत्पादित केलेल्या पिकाला योग्य दर देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. मल्लिकार्जुन खर्गेसारखे अनुभवी नेते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. देशात आमचे सरकार येणार असून कारवारमध्ये निंबाळकर मोठ्या मताधिक्याने विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.

गॅरंटी योजना कोणत्या घटकापर्यंत कितपत पोहोचल्या आहेत

कर्नाटकमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. लोकांना खाण्यापिण्याची समस्या आहे. लोकांना कामधंदे नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. भारत सरकारने कर्नाटकाला दुष्काळ निधी अल्पप्रमाणात दिला. उलट कर्नाटक सरकारकडून भारत सरकारला मोठ्या प्रमाणात कर जातो. त्यापैकी केवळ 13 टक्के रक्कम कर्नाटकाला मिळते. अन्य रक्कम कुठे जाते कुणाला माहित. गत विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये पाच गॅरंटी योजना देणार असल्याची जाहीर केले होते. त्यानुसार कर्नाटकात काँग्रेस पक्ष सत्तेवर येताच पाचही योजनाची अंमलबजावणी उत्तमप्रकारे केली आहे.

Advertisement
Tags :

.