For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार मतदारसंघातून अंजली निंबाळकर निवडून येणार

12:58 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार मतदारसंघातून अंजली निंबाळकर निवडून येणार
Advertisement

खेमेवाडी येथील प्रचारसभेत अॅड. ईश्वर घाडी यांनी व्यक्त केला विश्वास

Advertisement

वार्ताहर /नंदगड

काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत पाच गॅरंटी योजना जारी केल्याप्रमाणे कर्नाटकातील प्रत्येक जनतेला त्यांचा लाभ मिळत आहे. कर्नाटकातील जनता या वेळी शंभर टक्के काँग्रेसला मते देणार आहे. कारवार मतदारसंघातून अंजली निंबाळकर निवडून येणार असल्याचा ठाम विश्वास खानापूर तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी यांनी व्यक्त केला. खानापूर शहरापासून 3 कि.मी.वर असलेल्या खेमेवाडीतील शेतवडीत सुरू असलेल्या रोहयो कामाच्या ठिकाणी  काँग्रेस कार्यकर्त्यांनी उमेदवार अंजली निंबाळकर यांचा प्रचार केला. यावेळी अॅड. ईश्वर घाडी बोलत होते. त्यांच्यासमवेत खानापूर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा अनिता दंडगल, महादेव घाडी, यशवंत बिरजे, राजू पाटील, अंजली ठोंबरे, सुरेश दंडगल आदी कार्यकर्ते होते.

Advertisement

अॅड. घाडी म्हणाले, खानापूर तालुक्यात 30 वर्षात पहिल्यांदा माजी आमदार अंजली निंबाळकर या मराठी भाषिक उमेदवाराला काँग्रेसने उमेदवारी दिल्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. सर्व थरातून, सर्व जाती धर्मातून एकच आवाज म्हणजे काँग्रेसला मत असे समीकरण झाले आहे. कारण यावेळीसुद्धा काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात वीस गॅरंटी, शेतकऱ्यांचे सर्व कर्ज माफ,  कुटुंब प्रमुख महिलेला एक लाख रु., शिवाय पंचन्याय, नारी, युवा, कृषी कार्मिक, अन्य घटकांच्या विकासासाठी योजना जाहीर केल्या आहेत. आमदार  असताना त्यांनी हायटेक बसस्टँड, दवाखाना, आवश्यक ठिकाणी रस्ते व अन्य विकासकामे राबविली आहेत. महादेव घाडी म्हणाले, काँग्रेस हा गोरगरीब व श्रीमंतांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यांना निवडून दिल्यास कारवार, खानापूरच्या समस्या समस्या सुटणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. ब्लॉक काँग्रेस अध्यक्षा अनिता दंडगल, अंजली ठोंबरे यांनी सरकारकडून मिळणाऱ्या योजनांची माहिती दिली. त्याची परतफेड म्हणून सर्व महिलांनी काँग्रेसलाच भरभरून मते द्यावीत, असे आवाहन केले.

Advertisement
Tags :

.