For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनिता पड्डाचा ‘हुंकार’

06:59 AM Sep 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनिता पड्डाचा ‘हुंकार’
Advertisement

मागील वर्षी ‘सैयारा’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकणारी अनीत प•ा आता अभिनयाच्या जगतात परतली आहे. अनीतची बहुप्रतीक्षित सीरिज ‘हुंकार’ची अधिकृत घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली आहे. तसेच हुंकारचा नवा टीझरही समोर आला आहे. निर्मात्यांनी हुंकारचे फर्स्ट लुक पोस्टर शेअर केले आहे. या सीरिजमध्ये अनीत प•ा मुख्य भूमिकेत आहे. यात ती मीनू रावत नावाची भूमिका साकारत आहे, ही युवती एका मोठ्या आणि धार्मिक व्यक्तीच्या विरोधात शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप करते. हा व्यक्ती स्वत:च्या क्षेत्रातील बाहुबली असून पोलिसांचेही त्याच्यासमोर काही चालत नसते. बाप जी नाव असलेल्या या व्यक्तीच्या विरोधातील न्यायाची लढाई मीनू जिंकणार का या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हुंकार वेबसीरिज पहावी लागणार आहे. अनीतसोबत या सीरिजमध्ये फातिमा सना शेख, राम कपूर आणि मोहम्मद जीशान आयूब हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येतील. हुंकार वेबसीरिज जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 25 सप्टेंबरपासून पाहता येणार आहे.

Advertisement

Advertisement

Advertisement
Tags :

.