महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

प्राणीदया आध्यात्म संदेश यात्रेला प्रारंभ

10:47 AM Oct 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जिल्हा पोलीसप्रमुखांच्या हस्ते उद्घाटन

Advertisement

बेळगाव : कक्केरी, ता. खानापूर येथील श्री बिस्टादेवी यात्रेत पशुहत्या, प्राणीहत्या रोखण्यासाठी बेंगळूर येथील विश्वप्राणी कल्याण मंडळाचे पीठाध्यक्ष श्री दयानंद स्वामीजी यांनी हाती घेतलेल्या अहिंसा, प्राणीदया आध्यात्म संदेश यात्रेला गुरुवारी चालना देण्यात आली. पोलीस मुख्यालयात जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या हस्ते या संदेश यात्रेची सुरुवात केली. यावेळी बोलताना जिल्हा पोलीसप्रमुख म्हणाले, केवळ कक्केरीच नव्हे तर जिल्ह्यातील कोणत्याही धार्मिक ठिकाणांवर पशुबळी, प्राणीबळी देऊ नये. न्यायालयाच्या आदेशानुसार भाविकांनी बळी परंपरेला फाटा द्यावा. अहिंसा प्राणीदया, आध्यात्म संदेश यात्रा कक्केरी, खानापूर, अळणावर परिसरात जाणार आहे. या परिसरात धार्मिक ठिकाणांवरील पशुबळी, प्राणीबळी रोखण्यासंबंधात जागृती करण्यात येणार असल्याचे दयानंद स्वामीजी यांनी सांगितले. प्राणीहत्या रोखण्यासाठी हुक्केरी येथे सर्व तयारी करण्यात आली असून बंदोबस्त तैनात करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीसप्रमुखांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article