For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिरुपतीच्या ‘प्रासादात’ चरबीयुक्त लाडूचा ‘प्रसाद’

06:22 AM Sep 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
तिरुपतीच्या ‘प्रासादात’ चरबीयुक्त लाडूचा ‘प्रसाद’
Advertisement

जगभरातील हिंदूमध्ये तीव्र संतापाची लाट : गोमंतक मंदिर महासंघाकडून पणजीत निदर्शने

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर करणे हा हिंदूंच्या धर्मश्रद्धेवर जाणीवपूर्वक केलेला आघात आणि विश्वासघात आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया पणजीत आझाद मैदानावर आयोजित निदर्शनादरम्यान व्यक्त करण्यात आल्या. गोमंतक मंदिर महासंघाच्या माध्यमातून ‘आम्ही हिंदू’, ‘विश्व हिंदू परिषद’, ‘केसरिया हिंदू वाहिनी’, ‘गोवा हिंदू युवाशक्ती’, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’, ‘माता मंदिर समिती, वास्को यासारख्या विविध मंदिरांच्या समित्या आणि त्यांचे कार्यकर्ते अन्य भाविक, या आंदोलनात सहभागी झाले होते. अशाप्रकारे प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळवून हिंदूंच्या भावनांशी खेळ मांडणाऱ्या महापाप्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करा आणि धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी त्यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी महासंघाचे जयेश थळी यांनी केली.

Advertisement

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती येथील श्रीतिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर केला जात असल्याची अत्यंत गंभीर बाब उघडकीस आणली होती. त्यानंतर जगभरातील हिंदू समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचे वडील सॅम्युअल राजशेखर रेड्डी हे मुख्यमंत्री असतांना तिऊपती मंदिराचे लाडू बनविण्याचे कंत्राट एका ख्रिस्ती आस्थापनाला देण्यात आले होते. तसेच मंदिराच्या विश्वस्तपदीही ख्रिस्ती व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती. त्याही पुढे जाताना मंदिर परिसरात ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या धर्मांतरणाला प्रोत्साहन दिले गेले. हे कमी म्हणून की काय आता प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळून हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे.

जगनमोहन रेड्डी आणि त्यांचे वडील सॅम्युअल यांच्या कार्यकाळात तिरुपती मंदिराशी संबंधित घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची सखोल चौकशी करण्यात यावी. त्या काळातील सर्व हिंदू धर्मविरोधी निर्णय तत्काळ स्थगित करावे, अशा मागण्या करण्यात आल्या. हे प्रकरण म्हणजे मंदिरांच्या सरकारीकरणाचा सर्वांत मोठा दुष्परिणाम आहे. तसेच अनेक धार्मिक स्थळी ‘थूंक जिहाद’, मंदिरांमधील देवाचा प्रसाद ‘हलाल उत्पादनां’पासून बनवण्याचा प्रकार समोर आला. मंदिरांमध्ये देण्यात येणारा प्रसाद हा सात्त्विक, शुद्ध, पवित्र तर असावाच, तसेच तो बनविणाऱ्या पासून वितरण व्यवस्थेतील प्रत्येक व्यक्तीही धर्मपरायण हिंदू असावा. हिंदू समाजाने उठाव करून आपली मंदिर संस्कृती भ्रष्ट होण्यापासून वाचवायला हवी’, असा सूरही प्रत्येक वक्त्याच्या मार्गदर्शनातून व्यक्त झाला. श्री. थळी यांच्यासह राजीव झा, सुजन नाईक, स्वामी हरीश्रद्धानंदजी, अभिजीत बोरकर, संजीव कोरगावकर आदींनी विचार मांडले.

Advertisement
Tags :

.