चांदोलीत बुद्ध पौर्णिमेला प्राणी गणना ! निसर्गप्रेमी घेतील चांदण्या रात्री निसर्ग अनुभव
सामान्यांना रोजच्या धकाधकीतून थोडा वेळ काढून त्यांना निसर्गाची अनुभूती घेता यावी, तेथे पशुपक्ष्यांचे त्यांच्याच नैसर्गिक अधिवासात मनसोक्त दर्शन घेता यावे, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष खुणांद्वारे ओळख पटवता यावी, रात्रीचे जंगल बौद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री पहायला मिळावे, उद्देशाने यावर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे निसर्गानुभव राबवण्यात येत आहे. बुद्ध पौर्णिमेला, 23 रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील कोयना व चांदोली या संरक्षित क्षेत्रातील जंगलात 60 हून अधिक मचाणावर बसून निसर्गप्रेमींना रात्रीच्या अरण्यवाचनाचाअनुभव घेता येणार आहे.
काही वर्षांपासून कॅमेरा ट्रॅपतून वन्यजीवांची गणना होत आहे. मात्र सामान्यांना वने व वन्यजीवांबाबत माहिती मिळावी, या उद्देशाने वन विभाग निसर्गानुभव उपक्रम राबवत आहे. सद्यस्थितीत उन्हाळा सुरू आहे. वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार केले आहेत. अशा पाणवठ्यांजवळ मचान बांधले आहेत.
निसर्गानुभवामध्ये सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म लिंक www.स्aप्aदू.gदन्.ग्ह वर उपलब्ध आहे. इच्छुकांनी लिंक उघडून गुगल फॉर्मद्वाके माहिती भरावी. भरलेले फॉर्म 20 मे रोजी दुपारी 12:00 पुर्वी पाठवावेत. सहभागी होण्यास इच्छुकांना 1500 रूपये शुल्क भरावे लागेल. सहभागी व्यक्तींना 22 रोजी दुपारी 3:00 ते 23 रोजी सकाळी 8:00 पर्यंत मचाणावर बसून वन्यप्राण्यांची निरीक्षणे करता येईल.
जानेवारी 2010 ला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची स्थापना करण्यात आली. व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ हे 1165.57 चौ. किलोमीटर आहे. व्याघ्र प्रकल्प सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिह्यात विभागला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प एकमेव आहे. पश्चिम महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या कोयना व वारणा जलाशयाचे गाळाने भरण्यापासून संरक्षण हे जंगल करत आहे. 15 नद्यांचा उगम या जंगलातून होतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले ठजागतिक नैसर्गिक वारसास्थळ आहे. येथील जैवविधतेसाठी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. व्याघ्र प्रकल्पात अनेक प्रकारच्या प्रदेशनिष्ठ प्रजातींचा अधिवास आहे.