For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सप्टेंबरमध्ये होणार जनावरांची गणती

10:37 AM Jun 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सप्टेंबरमध्ये होणार जनावरांची गणती
Advertisement

एकूण संख्या समजणार : पशुसंगोपनतर्फे तयारी 

Advertisement

बेळगाव : एकूण पशुधनाची निर्दिष्ट संख्या समजावी, यासाठी पशुगणना करण्यात येणार आहे. येत्या सप्टेंबरनंतर पशुगणनेला चालना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण जनावरांची संख्या,औषधाचा पुरवठा आणि लसीकरण याबाबतची सर्व माहिती समोर येणार आहे. विशेषत: जनावरांच्या कानावर बारा अंकी टॅग लावण्यात आला आहे. त्यामुळे जनावरांची पशुगणना करणे सोयीस्कर होणार आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार सप्टेंबर ते डिसेंबर 2024 दरम्यान 21 वी पशुगणना करण्यात येणार आहे. त्यामुळे आतापासूनच पशुसंगोपनने याबाबतची तयारी हाती घेतली आहे.

2019 मध्ये झालेल्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात 13 लाख मोठ्या जनावरांची संख्या आहे. त्यामुळे आता सप्टेंबरमध्ये होणाऱ्या पशुगणनेमध्ये जनावरांची संख्या वाढणार की कमी होणार? हे समजणार आहे. 2019 मध्ये कोरोना काळात धोका पत्करुन पशुगणनेला सामोरे जावे लागले होते. मात्र यंदाच्या वर्षी सुरळीतपणे ही गणना केली जाणार आहे. पशुगणना करताना मोबाईलवर अपडेट द्यावे लागणार आहेत. त्यामुळे हे काम ऑनलाईन पद्धतीने चलणार आहे. विशेषत: पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पशुसखींची मदत मिळणार आहे. विशेषत: पशुगणनेमुळे एकूण जनावरांची संख्या आणि त्यांना लागणारी औषधे व लसीकरण याबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार ग्रामीण भागातील 3 हजार कुटुंबांकरिता एक आणि शहरी भागातील 4 हजार कुटुंबांकरिता एक प्रगणक नेमला जाणार आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.