For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Radhanagari wildlife sanctuary | राधानगरीत बुद्ध पौर्णिमेला 'प्राणीगणना'; पाणवठ्यावर रंगणार वन्यप्राण्यांचा मेळा, वनविभागाची जय्यत तयारी

12:49 PM Apr 28, 2026 IST | NEETA POTDAR
radhanagari wildlife sanctuary    राधानगरीत बुद्ध पौर्णिमेला  प्राणीगणना   पाणवठ्यावर रंगणार वन्यप्राण्यांचा मेळा  वनविभागाची जय्यत तयारी
Advertisement

                    राधानगरी अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेला प्राणीगणना

Advertisement

राधानगरी -बन्यजीव विभागाच्या वतीने गुरुवार दि. १ मे रोजी बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर राधानगरी वन्यजीव अभयारण्यात प्राणीगणनेचे आयोजन करण्यात आले आहे. अभयारण्यातील बन्यजीवांची संख्या, त्यांच्या अधिवासाची स्थिती आणि त्यांच्या बाबरण्याच्या सवयींचा अभ्यास करण्यासाठी ही गणना अत्यंत महत्त्वाची मानली जाते, अशी माहिती विभागीय बनाधिकारी श्रीकांत पवार (वन्यजीव) यांनी दिली.

बुद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाश अधिक असल्याने वन्यप्राणी पाणवठ्यांबर आणि मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे या काळात करण्यात येणारी गणना अधिक अचूक ठरते. वन विभागाने अभयारण्यातील
विविध पाणवठे, बनमार्ग आणि वन्यप्राण्यांच्या नियमित बाबराच्या ठिकाणी विशेष निरीक्षण केंद्रे उभारण्याची तयारी पूर्ण केली आहे, असे ते म्हणाले. राधानगरी अभयारण्य हे जैवविविधतेने समृद्ध असून, विशेषतः गव्याच्या अधिवासासाठी
प्रसिद्ध आहे. प्राणीगणनेतून मिळणारी माहिती वन्यजीव संरक्षण, अधिवास व्यवस्थापन, पाणवठ्यांचे नियोजन आणि संवर्धनात्मक उपाययोजनांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

Advertisement

वन्यजीव संवर्धनासाठी स्थानिक नागरीक, निसर्गप्रेमीआणि स्वयंसेवकांनी याकामी सहकार्य करावे, असे आवाहन राधानगरी वन्यजीव विभागाने केले आहे. हा उपक्रम अभयारण्यातील वन्यजीवांच्या सुरक्षिततेसह पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रशिक्षित स्वयंसेवकांचाही सहभाग
या प्राणीगणनेत वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, वनरक्षक, तसेच प्रशिक्षित स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. निरीक्षकांना विशिष्ट ठिकाणी बसवून रात्रीच्या वेळी वन्यप्राण्यांच्या हालचाली, संख्या आणि प्रजातींची नोंद केली जाणार आहे. यामध्ये गवा, बिबट्या, अस्वल, सांबर, भेकर, रानडुक्कर, ससा तसेच विविध पक्ष्यांचीही नोंद यावेळी घेतली जाणार आहे.

Advertisement
Tags :

.