‘फॅमिली बिझनेस’ सीरिजमध्ये अनिल कपूर
हंसल मेहताचा दमदार कॉर्पोरेट ड्रामा
नेटफ्लिक्सची आगामी सीरिज ‘फॅमिली बिझनेस’ची घोषणा झाली आहे. प्रसिद्ध फिल्ममेकर हंसल मेहतांच्या दिग्दर्शनातील ही सीरिज सत्ता, रक्ताचे नाते आणि विश्वासघाताच्या अवतीभवती घुटमळणारी एक हाय-व्होल्टेज कॉर्पोरेट ड्रामा आहे. सीरिजमध्ये अनिल कपूर आणि विजय वर्मा या शैलीत आमने-सामने दिसून येणार आहेत. कहाणी एक अशा दूरदर्शी अब्जाधीश उद्योजकापासून सुरू होणार आहे, जो भारताच्या सर्वात मोठ्या बिझनेस कॉन्ग्लोमरेटची धुरा स्वत: निवडलेल्या उत्तराधिकाऱ्याला सोपवितो. हा नवा उत्तराधिकारी आता सत्ता कायमस्वरुपी आपल्या हातात आल्याचा विचार करत असतो. परंतु काही महिन्यातच स्थिती बदलून जाते. मेंटर अचानक त्याला पदावरून हटवतो आणि स्वत: पुन्हा धुरा हाती घेत असतो.
हा अपमान आणि सत्तेपासून बेदखल होणे उत्तराधिकाऱ्याला बंडाच्या मार्गावर लोटणारे ठरते. यानंतर कॉर्पोरेट सक्सेशनची ही लढाई एका निर्दयी संघर्षात रुपांतरित होते. कहाणी पुढे सरकू लागताच जुनी गुपितं समोर येऊ लागतात, नात्यांना तडा पडू लागतो. प्रश्न केवळ ब्रिझनेस नियंत्रणाचा राहत नाही, तर वारसा, रक्ताचे नाते आणि वैयक्तिक सूडाची आग पूर्ण फॅमिली एम्पायरला तोडण्याच्या वाटेवर नेणारा ठरतो. या सीरिजची कहाणी दीपाली गुप्त यांनी लिहिली आहे. तर संवादाची जबाबदारी निरेन भट्ट, अंकुर पाठक आणि निखिल नायर यांनी सांभाळली आहे. एंबडँशिया एंटरटेन्मेंट आणि ट्रू स्टोरी फिल्म्सच्या बॅनर अंतर्गत या सीरिजची निर्मिती करण्यात आली आहे.
अनिल कपूर, विजय वर्मासोबत या सीरिजमध्ये आकाश खुराना, रिया चक्रवर्ती, नेहा धूपिया, अनंत नाग, कंवलजीत सिंह, ध्रूव सहगल, नंदिश संधू, टीना देसाई, रायमा सेन समवेत अनेक दमदार कलाकार दिसून येणार आहेत. नेटफ्लिक्सच्या ‘नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स’ स्लेट अंतर्गत या सीरिजची पहिली झलक दाखविण्यात आली आहे.