For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिणेच्या बिगबजेट चित्रपटात अनिल कपूर

06:01 AM Feb 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
दक्षिणेच्या बिगबजेट चित्रपटात अनिल कपूर
Advertisement

बॉलिवूडचा एव्हर यंग अभिनेता अनिल कपूर वयाच्या 69 व्या वर्षीही अत्यंत तंदुरुस्त असून चित्रपटसृष्टीत सक्रीय आहे. आता अनिल कपूर एका दाक्षिणात्य चित्रपटात ज्युनियर एनटीआरसोबत दिसून येणार आहे. याची माहिती अनिल कपूर यांनीच दिली आहे.ज्युनियर एनटीआरचा प्रशांत नीलकडून दिग्दर्शित चित्रपट ‘ड्रॅगन’मध्ये अनिल कपूर दिसून येईल. या चित्रपटाद्वारे अनिल कपूरने तेलगू चित्रपटसृष्टीत कमबॅक केले आहे. आगामी काळात अनिल कपूर हा दोन तेलगू किंवा दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.

Advertisement

केजीएफ फेम दिग्दर्शक प्रशांत नीलकडून दिग्दर्शित ‘ड्रॅगन’मध्ये ज्युनियर एनटीआरसाब्sात रुक्मिणी वसंत आणि टोविनो थॉमसही मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. आता अनिल कपूरची एंट्रीही निश्चित झाल्याने या चित्रपटात प्रेक्षकांना अनेक दिग्गज कलाकार एकत्र पाहता येणार आहेत.

अनिल कपूर यापूर्वी वॉर 2 या चित्रपटात दिसून आला होता. यशराजच्या या स्पाय युनिव्हर्सच्या चित्रपटात ऋत्विक रोशन आणि ज्युनियर एनटीआर प्रमुख भूमिकेत होता. आता वॉर 2 नंतर अनिल कपूर पुन्हा एकदा ज्युनियर एनटीआरसोबत मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. तर अनिल कपूरने 1980 मध्ये तेलगू चित्रपट ‘वंश वृक्षम’द्वारे तेलगू चित्रपटसृष्टीत पदार्पण पेले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.