For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनिकेत तेंडोलकर यांनाच पं.स.ची उमेदवारी मिळावी

10:59 AM Jan 21, 2026 IST | अनुजा कुडतरकर
अनिकेत तेंडोलकर यांनाच पं स ची उमेदवारी मिळावी
Advertisement

झाराप पं .स.मधील कार्यकर्ते - ग्रामस्थ एकवटले ; मेळावा घेऊन केले शक्तीप्रदर्शन.

Advertisement

कुडाळ -

झाराप पंचायत समिती मतदारसंघात अनिकेत तेंडोलकर यांना महायुतीची उमेदवारी मिळाली पाहिजे,या मागणीसाठी झारापवासीयांसह पं .स.मतदार संघातील कार्यकर्ते व ग्रामस्थ सोमवारी सायंकाळी उशिरा मोठ्या संख्येने एकवटले आणि एक प्रकारे शक्तीप्रदर्शन केले.अनिकेत तेंडोलकर हेच आमचे उमेदवार आहेत.त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार करीत उपस्थितांनी केला कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या या भूमिके नंतर या मतदारसंघात कुणाला उमेदवारी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.कुडाळ तालुक्यातील झाराप पं. स. मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे. हा मतदारसंघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिंदे शिवसेनेचे युवासेना कुडाळ तालुका प्रमुख अनिकेत तेंडोलकर यांना महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी मिळावी.यासाठी कार्यकर्ते व ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. अनिकेत तेंडोलकर यांनाच या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून गावासह लगतच्या गावातील कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी झाराप येथे मेळावा आयोजित करून एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले. कार्यकर्ते व ग्रामस्थ उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने एकवटले. यात महिलांचाही सहभाग लक्षणीय होता. या मेळाव्या दरम्यान अनिकेत तेंडोलकर यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तेंडोलकर हेच आमचे उमेदवार आहेत. आमच्या मनातील ते उमेदवार असल्याच्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार करण्यात आला. परिसरात झळकलेले बॅनर आणि घोषणाबाजीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी अनिकेत तेंडोलकर यांची सामाजिक बांधिलकी, जनतेशी असलेला थेट संपर्क तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांबाबतची त्यांची सातत्यपूर्ण भूमिका अधोरेखित केली. झाराप मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तळागाळात काम करणाऱ्या श्री तेंडोलकर यांच्यासारख्या युवा कार्यकर्त्याला संधी मिळावी, अशी भावना व्यक्त करण्यात आली. झारापचे माजी सरपंच प्रदीप तेंडोलकर व. जि. प. माजी अध्यक्ष दिनेश साळगावकर यांनी मनोगत व्यक्त केले.या मेळाव्यातून कार्यकर्त्यांनी स्पष्टपणे संकेत दिले की, झाराप पंचायत मतदारसंघात तेंडोलकर यांना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन लाभत आहे. या शक्तीप्रदर्शनामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर त्याचा प्रभाव पडताना दिसत असून महायुतीच्या उमेदवारीबाबतची चर्चा अधिक रंगू लागली आहे.दरम्यान, या शक्तीप्रदर्शनानंतर झाराप मतदारसंघात महायुतीकडून नेमकी उमेदवारी कुणाला जाहीर होते, याकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.