Sangli News | "माझ्याविरुद्ध पोलिसात का गेला?" असं म्हणत रात्रीच्या अंधारात बापाने पोटच्या मुलासोबत काय केलं?
सांगली : पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून संशयित विठ्ठलदत्तात्रय फडतरे (वय ४८, रा. जुना बुधगाव रस्ता, सांगली) याने दोघांबर चाकूहल्ला केल्याचा प्रकार घडला. याबाबत जखमी रोहन आनंदा चव्हाण (वय ३२, रा. जुना बुधगाव रस्ता, हिंदवी स्वराज कॉ लनी, सांगली) याने फिर्याद दिली आहे.
फिर्यादी रोहन चव्हाण आणि त्याचा मित्र सार्थ फडतरे हे दोघेजण शुक्रवारी रात्री जुना बुधगाव रस्त्यावरील लक्ष्मी गॅरेज येथे बोलत बसले होते. तेव्हा सार्थकचे वडील संशयित विठ्ठल फडतरे तेथे आले. त्याने मुलगा सार्थकला उद्देशून माझ्याविरूद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा का दाखल केला असा जाब विचारून शिवीगाळ केली.
त्यानंतर सोबत आणलेला चाकू काढून सार्थकच्या डोक्यात बार केला. रोहन अडवण्यासाठी पुढे आल्यानंतर त्याला देखील शिवीगाळ केली. तसेच त्याच्या डाव्या हातावर चाकूने बार केला. हल्ल्यानंतर फडतरे तेथून निघून गेला. जखमी रोहन आणि सार्थक यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारानंतर शनिवारी रोहन चव्हाण याने विठ्ठल फडतरेविरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.