For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनगोळ बैलगाडा शर्यतीस प्रारंभ, रविवार पर्यंत रंगणार शर्यत

09:54 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
अनगोळ बैलगाडा शर्यतीस प्रारंभ  रविवार पर्यंत रंगणार शर्यत
Advertisement

बेळगाव : अनगोळ श्रीराम सेना हिंदुस्थान यांच्या वतीने आयोजित बेळगाव हिंदकेसरी किताबाच्या शर्यतीचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडला. अनगोळ येथील मरगाई मंदीर जवळील तलावात श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभाग यांच्या वतीने मोठा गट व लहान गट अशा दोन गटात भव्य जंगी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीचे उद्घाटन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व श्रीराम सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, शहर समितीचे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील यांच्या हस्ते झाले. छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले. यानंतर गाड्यांचे पुजन करून शर्यतीला सुरवात झाली. संघटनेच्या वतीने अनगोळ गावामधील मरगाई मंदीरसमोरील तलावात नवीनच मैदान करण्यात आले आहे. मैदानाभोवती प्रेक्षकांना बसण्यासाठी  गॅलरीची सोय, सी सी टिव्ही क्रीन, जोड्यांना पळण्यासाठी आकर्षक फज्जा, करण्यात आले आहे. प्रेक्षकांना शर्यत पाहण्यासाठी  व्यवस्था करण्यात आल्याने प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित रहात आहेत. यावेळी अनगोळ येथील सामाजिक कार्यकर्ते उमेश कुऱ्याळकर, माजी नगरसेवक मोहन भांदुर्गे,  श्रीकांत कुऱ्याळकर, राजु पवार, श्याम गौंडाडकर, मनोज चवरे,  आनंद पाटील, जोतिबा लाटुकर, लक्ष्मण धामणेकर, बाळू कुऱ्याळकर, सुनील भिंगार्डे, शंकर जाधव, लक्ष्मण धामणेकर, मल्लाप्पा सोमण्णाचे, अप्पय्या सातगौडा, अशोक मुतगेकर, रघु जाधव, मल्लाप्पा सांबरेकर तसेच गावातील शेतकरी बांधव, पंच कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

लहान गट : सद्या सिध्देश्वर प्रसन्न हलगीमर्डी यरमळ्ळी ही जोडी 33 सेकंद 73 मि.ली सेकंदमध्ये धावून पहिल्या क्रमांकावर आहे. सायंकाळी पावसामुळे शर्यत थांबवण्यात आली होती. शनिवारी सकाळी ठीक 9 वाजता लहान गट व मोठ्या गटाची  शर्यत सुरू होणार आहे. आणि रविवारी शर्यतीचा अंतिम दिवस असणार आहे. तरी बैलजोडी मालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.