महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पशुसंवर्धनमंत्र्यांच्या गैरहजरने दूध उत्पादकांत संताप

12:45 PM Dec 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वाळपई येथील दुग्ध उत्पादक मेळाव्यात अधिकाऱ्यांना धरले धारेवर : मंत्र्यांकडून प्रश्नांची उत्तरे अपेक्षित होती!

Advertisement

वाळपई : विचारलेल्या प्रŽांना समर्पक उत्तरे द्यायचे असेल तरच आम्ही बैठकीला बसतो. अन्यथा आपण मेळाव्यावर बहिष्कार घालतो. असा इशारा देत आक्रमक भूमिका दूध उत्पादक मेळाव्यात शेतकऱ्यांनी घेतली. यावेळी पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर उपस्थित न राहिल्यामुळे यावेळी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.  मुख्यमंत्री प्रमोद सावंत हेही मेळाव्यात हजर न राहिल्यामुळे नाराजी व्यक्त  करण्यात आली. वास्तविक आमचे प्रŽ आम्ही थेट मंत्राच्या कानी घालणार होतो. त्यांच्याकडून आम्हाला उत्तरे हवी होती. मात्र ते आले नसल्यामुळे विचारलेल्या प्रŽांची उत्तरे आपल्याकडे आहेत का? निर्माण झालेल्या समस्यावर उपाययोजना काढण्यात येणार का? असा प्रŽ विचारून मेळाव्यामध्ये सुऊवातीलाच वातावरण संतप्त बनले. मात्र या ठिकाणी उपस्थित पशुसंवर्धन खात्याचे संचालक प्रसाद वळवईकर यांनी समाधानकारक दिल्याने मेळाव्याला सुऊवात झाली. गोवा पशुसंवर्धन आणि पशुचिकित्सा खात्यातर्फे वाळपई कदंबच्या सभामंडपात दूध उत्पादकांसाठी मंगळवारी हा मेळावा आयोजित केला होता. कर्नाटकातून येणारा चारा पूर्णपणे बंद झाल्यामुळे गुरांच्या खाद्याचे दर भरमसाठ वाढत आहे. राज्यात हिरवा चारा मिळणे कठीण बनले आहे. त्यामुळे दुधाचा व्यवसाय अडचणीत आला आहे. याबाबत वारंवार मागणी करूनही याकडे सरकारी लक्ष देण्यास सरकारची यंत्रणा कमी पडत आहे. अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र अद्याप तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. अशी कैफियत दूध उत्पादकांनी यावेळी मांडली.

Advertisement

आरोग्यमंत्री विश्वजित राणेंना निमंत्रण नाही

दरम्यान आरोग्य मंत्री तथा स्थानिक आमदार विश्वजित राणे यांनी निमंत्रण न मिळाल्यामुळे आपण मेळाव्याला उपस्थित राहू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया प्रस्तूत प्रतिनिधीशी बोलताना दिली. गोव्यामध्ये दुधाचे उत्पादन वाढावे. यासाठी दूध उत्पादकांचे तालुकास्तरीय मेळावे घेण्याचे सत्र सरकारने चालविलेले आहे. अशाच प्रकारचा मेळावा वाळपई येथे आयोजित केला होता. यावेळी तालुक्याती शेतकरी व दूध उत्पादकाची उपस्थिती होती. यावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर व मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे येणार नसल्याची माहिती समजताच वातावरण तंग बनले. शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांसमोर प्रŽांचा भडीमार करून धारेवर धरले. यावेळी पशुसंवर्धन खात्याचे संचालक प्रसाद वळवईकर , उपसंचालक डॉ. नितीन नाईक, डॉ. राजेश केणी, डॉ. रामा परब, प्रगतशील दूध उत्पादक विनोद जोशी, प्रसाद कामत संभारी, प्रितम पाटील, सिकेरी गोशाळेचे कमलाकांत तारी यांची उपस्थिती होती. शेतकरी विनोद जोशी तन्य डॉक्टरांच्या सल्ल्याने गोव्यात कोणती जातीची गाय सुस्थितीत राहून चांगले दूध उत्पादन मिळू शकते याचा अभ्यास करण्याची आवाहन केले. प्रसाद कामत संभारी यांनी आपण अडीच एकरात चारा लागवड केल्याचे सांगून गुरांना घरगुती स्वत: निर्माण कारवा. प्रितम पाटील यांनी  पडीक जमिनीत शेतकरी वर्गाला चारा पीक लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याची मागणी केली. सुभाषचंद्र गावस यांनी मान्यवरांची ओळख करून दिली. सिध्दी उपाध्याय यांनी सूत्रसंचालन केले. केले. डॉ. रामा परब यांनी आभार मानले.

दूध उत्पादकांना साधन सुविधा पुरविणार!

आजच्या मेळाव्यात दुध शेतकऱ्यांना मांडलेल्या समस्या सरकार दरबारी सोडविण्यासाठी प्रयत्न असणार आहे. दूध उत्पादन वाढविण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे संचालक प्रसाद वळवईकर यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी योग्य साधन सुविधा पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article