महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हॉलिवूडचा निरोप घेणार एंजेलिना

06:15 AM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एंजेलिना जोलीने हॉलिवूड आणि लॉस एंजिलिसवरून केलेल्या एका वक्तव्यामुळे चाहत्यांना धक्का बसला आहे. लॉस एंजिलिस शहराबाहेर पडत अन्य ठिकाणी वास्तव्य करण्याची योजना असल्याचे तिने सांगितले आहे. योग्यवेळी कंबोडियात स्थायिक होण्याची माझी योजना आहे. या निर्णयामुळे ब्रॅड पिटसोबतचा घटस्फोट आणि स्वत:चे कुटुंब कायदेशीर कार्यवाहीत गुंतून पडणे देखील कारण असल्याचे तिने मान्य केले आहे.

Advertisement

मी हॉलिवूडच्या वातावरणात लहानाची मोठी झाली आहे, यामुळे मी कधीच यामुळे अत्यंत प्रभावित झालेले नाही. मी कधीच याला तितके महत्त्वपूर्ण मानले नाही. लॉस एंजिलिस सोडण्याचा निर्णय हा घटस्फोटानंतर घडलेल्या घडामोडींचा हिस्सा आहे. मी स्वतंत्रपणे राहण्याची आणि प्रवास करण्याची क्षमताच गमाविली आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा मी बाहेर पडणार आहे. जगातील सर्व जागांमध्ये हॉलिवूड हे काही फारसे चांगले ठिकाण नसल्याचे तिने म्हटले आहे.

Advertisement

माझी कुठलीच सोशल लाइफ नाही. तसेच सध्या मी कुणालाच डेट करत नाही. माझी मुलेच माझे मित्र आहेत. माझ्या आणि माझ्या जीवनातील सर्वात जवळचे लोक तेच आहेत. आम्ही 7 जण अत्यंत वेगळे असून परस्परांची शक्ती आहोत असे एंजेलिना म्हणाली. अभिनेत्रीला ब्रॅड पिटपासून 6 मुले मॅडॉक्स (22 वर्षे), पॅक्स (20 वर्षे), जहरा (18 वर्षे), शिलोह (17 वर्षे) आणि जुळी नॉक्स तसेच विवियन (15वर्षे) अशी मुले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article