For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडी सेविका करणार ‘लाडक्या बहिणीं’ची पडताळणी

06:25 AM Feb 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
अंगणवाडी सेविका करणार  ‘लाडक्या बहिणीं’ची पडताळणी
Advertisement

प्रतिनिधी,/ मुंबई :

Advertisement

राज्यातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांची संख्या सुमारे अडीच कोटीपर्यंत पोहोचली असतानाच त्यांची आता पडताळणी सुरू करण्यात येणार आहे. पडताळणीचे काम अंगणवाडी सेविकांवर सोपविण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अडीच कोटींहून आधी असल्या तरी  काही महिलांनी निर्धारित निकषांची पूर्तता केली नसल्याने त्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. महिला आणि बालकल्याण विभागाने अशा महिलांना योजनेतून वगळण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत.

योजनेचे खरे लाभार्थीच लाभ घेऊ शकतील आणि सरकारने निवडणुकीत दिलेले 2100 ऊपयांचे आश्वासन लागू करतांना तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडू नये न यासाठी सरकारमध्ये खबरदारी घेण्यावर चर्चा सुरू आहे. यासाठी, अंगणवाडी सेविका घराघरात जाऊन पडताळणी करणार आहेत.

Advertisement

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या घरात चारचाकी वाहन असल्यास, त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरी जाऊन तपासणी करणार आहेत. कुटुंबात चारचाकी वाहन आढळल्यास त्या महिलांना अपात्र ठरविण्यात येणार आहे.

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण़ाऱ्यांना लाखो महिलांनी योजनेसाठी आवश्यक निकषांची पूर्तता केली नसल्याचे आढळून आले आहे. योजनेच्या अंतर्गत गरूजू आणि  वास्तविक लाभार्थी महिलांनाच लाभ मिळावा यासाठी ही पडताळणी सुरू केली जाणार आहे. याशिवाय सरकारने निवडणुकीत दिलेल्या 2100 ऊपयांच्या आश्वासनाची अंमलबजावणी करतांना तिजोरीवर अतिरिक्त बोजा येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.