For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंगणवाडी कर्मचारी राज्य अधिवेशन 9 फेब्रुवारी रोजी कुडाळला

05:02 PM Jan 31, 2025 IST | अनुजा कुडतरकर
अंगणवाडी कर्मचारी राज्य अधिवेशन 9 फेब्रुवारी रोजी कुडाळला
Advertisement

कुडाळ -

Advertisement

अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) या युनियनचे राज्य अधिवेशन 9 फेब्रुवारी रोजी कुडाळ - उद्यमनगर येथील श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटर येथे आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 4 या वेळेत सदर अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला सुमारे 2 हजार अंगणवाडी कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे यजमानपद यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाले आहे, अशी माहिती या युनियनच्या सरचिटणीस कमलताई परुळेकर यांनी दिली.अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) ही आमची महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पहिली युनियन असून कामगार नेते माजी आमदार कै.बा .न.राजहंस यानी त्याची स्थापना केली.त्याला आज 40 वर्षे झाली.माजी खासदार मृणाल गोरे या देखील अनेक वर्षे युनियनच्या अध्यक्ष होत्या.दर दोन वर्षानी युनियनचे राज्य अधिवेशन कुठल्याही एका जिल्ह्यात घेतले जाते.यावर्षी या अधिवेशनाचे यजमानपद सिंधुदुर्गला मिळाले आहे.कुडाळ -उद्यमनगर (मुबई गोवा हायवे नजीक ) श्री वासुदेवानंद ट्रेड सेंटर 9 फेब्रुवारी रोजी होणारं आहे.11ते 4 या वेळेत अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात सुमारे 2000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणार असून यात सिंधुदूर्गसह नागपूर, गोंदिया भंडारा,यवतमाळ,नाशिक नगर,सोलापूर,कोल्हापूर,सातारा,सांगली, पुणे,धुळे, रत्नागिरी येथील अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत.युनियनच्या अध्यक्षा अँड. निशा शिवूरकर, उपाध्यक्ष नितीन पवार, कार्याध्यक्ष किसनाताई भानारकर, हिन्द मजदूर सभा (महाराष्ट्र ) चे कार्याध्यक्ष आणि मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष साथी अशोक जाधव मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत,असे श्रीमती परुळेकर यांनी सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा अंगणवाडी पतसंस्थेला पण 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे रौप्यमहोत्सव त्याच ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे. माजी खासदार आणि नेत्या मृणाल गोरे यांच्या हस्ते या पतसंस्थेचे उदघाटन झाले होते,त्या पतसंस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे. 327 सभासदांच्या रूपये 32 हजार भाग भांडवलात सुरू झालेल्या या पतसंस्थेचे आज 2725 सभासद आहेत आणि 1 कोटी 40 लाखावर भागभांडवल पोहोचले आहे.सभासदांकडून येणाऱ्या मासिक बचतीतून सेविकाना 3 लाख व मदतनीसना दीड लाख रू.पर्यंत सुलभ पध्दतीने कर्जपुरवठा केला जातो.वार्षिक उलाढाल 10 कोटीवर गेली आहे.गेली 25 वर्षे बिनविरोध निवडणूक आणि सातत्याने ऑडीटवर्ग अ मिळविणारी संस्था हेच आमचे यश आहे,असे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला सिंधुदुर्गातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कमलताई परुळेकर व पतसंस्थेच्या चेअरमन ( मालवण ) रोहिणी लाड यानी केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.