महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अंगणवाडी सेविका-साहाय्यिका तीन महिन्यांपासून पगाराविना

10:45 AM Aug 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंगणवाडी बालकांना-गरोदर महिलांना निकृष्ट अन् मुदतबाह्या आहाराचा पुरवठा : गणेशचतुर्थीला तरी पगार देणार का ?

Advertisement

खानापूर : तालुक्यातील 380 अंगणवाडी शिक्षिका आणि साहाय्यिकांचा पगार गेल्या तीन महिन्यापासून केलेला नाही. तसेच अंगणवाडी बालकांना आणि गरोदर महिलांना अंड्याचे पैसेही जमा करण्यात आले नसल्याने अंगणवाडी शिक्षिका आणि साहाय्यिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. निदान गणेशचतुर्थीला तरी पगार जमा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अंगणवाड्यांना पुरविण्यात येणारा पौष्टिक आहार हा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचा तसेच सडलेला असून मुदतबाह्या पौष्टिक आहाराचे वितरण करण्यात येत असल्याने अंगणवाडी शिक्षिका हतबल झाल्या आहेत. महिला बाल कल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याबाबत  लक्ष घालून पौष्टिक आहार आणि पगाराबाबत तातडीने निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement

अंगणवाडी शिक्षिका आणि साहाय्यिकांचा पगार गेल्या तीन महिन्यापासून केला नसल्याने त्यांची पगाराविना आर्थिक कुचंबणा होत आहे. अंगणवाडीतील मुलांना आणि गरोदर महिलांना पौष्टिक आहार म्हणून अंडी देण्यात येतात. यात मुलांना आठवड्यातून दोन आणि गरोदर महिलांना महिन्याला 24 अंडी देतात. ही अंडी शिक्षिकेनी स्वत:कडील पैसे घालून अंडी पुरविली पाहिजेत, त्यानंतर अंड्याचे पैसे शिक्षिकेच्या खात्यावर जमा होतात. अंड्याचे पैसेही गेल्या तीन महिन्यापासून जमा झाले नसल्याने शिक्षिकांची मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. शिक्षिका उसणवार करून अंडी पुरवत आहेत. त्यामुळे या शिक्षिपेंची आर्थिक ओढाताण होत आहे. पगारही  नसल्याने शिक्षिका आणि साहाय्यिकांची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी शासनाकडूनच बिल जमा होत नसल्याने आम्ही काही करू शकत नसल्याचे सांगून हात झटकट आहेत. त्यामुळे अंगणवाडी शिक्षिकांची इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था झाली आहे.

 पौष्टिक आहारही अत्यंत निकृष्ट 

अंगणवाडी बालकाना देण्यात येणारा पौष्टिक आहारही अत्यंत निकृष्ट दर्जाचा पुरवण्यात येत असल्याने शिक्षिका बालकाना आहार देताना दडपणाखाली येत आहेत. अंगणवाडी मुलांना आठवड्यातून दोनवेळा उप्पीट, दोन दिवस मसाले भात, भात, आमटी, दोन दिवस अंडी देण्यात येतात. तसेच उप्पीटसाठी लागणारे तेल व इतर साहित्य पुरविण्यात येत नसल्याने बालकाना योग्य आहार मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच पुरविण्यात येणारे धान्य आणि रवा अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याने अंगणवाडीच्या बालकाना शिक्षिका खाऊ घालण्यास धजत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

नवीन पाकिटे देण्याची मागणी

तालुक्यातील अंगणवाडीतून गरोदर महिलांना पोषण आहाराचे वितरण करण्यात येते. मात्र अलीकडे अंगणवाडीतून त्या महिलांना मुदतबाह्या अन्नधान्यांच्या पाकिटांचे वितरण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच पुरविण्यात येणाऱ्या पौष्टिक आहारात पुरविण्यात येणारा गूळ खाण्यायोग्य नसल्याने या बाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. वितरण करण्यात आलेली अन्नधान्यांची पाकिटे परत घेऊन नवी अन्नधान्य पाकिटे वितरण करण्यात यावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.

बालकल्याण खात्याकडून कूपोषण दूर करण्यासाठी गरोदर महिला आणि बालकाना पौष्टिक अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. यासाठी सरकार करोडो रुपये खर्च करुन कुपोषण दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी पौष्टिक अन्नधान्याचा मोफत पुरवठा अंगणवाडीच्या माध्यमातून करण्यात येतो. यात गूळ, शेंगा तसेच विविध कडधान्ये, गूळ यासह इतर साहित्याचे वितरण करण्यात येते. गेल्या काही वर्षापासून पाकीटबंद अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. या पाकिटावर अन्नधान्याची मुदत छापण्यात येत आहे. तालुक्यातील काही अंगणवाडीतून या मुदतबाह्या पौष्टिक अन्नधान्याचे वितरण करण्यात आल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.

बाल कल्याण मंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

महिला बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वत: अंगणवाड्यांना भेट देवून पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्यांच्या पाकिटांची तसेच धान्याची पाहणी करून अंगणवाडीना उत्कृष्ट दर्जाचा आहार पुरविण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. याबाबत गरोदर महिला आणि बालकांच्या माताकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यासाठी मंत्री महोदयानी गांभीर्याने विचार करून अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या आहाराबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article