अनीत पड्डाला मिळाला बिगबजेट चित्रपट
बॉलिवूडमध्ये यंदा सैयारा चित्रपटाची मोठी चर्चा राहिली आहे. या चित्रपटात कुठलाच मोठा कलाकार नव्हता तरीही तो यशस्वी ठरला. चित्रपटातून अहान पांडे आणि अनीत पड्डा यांनी पदार्पण केले होते. अनीत आणि अहान यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना पसंत पडील होती. आता या चित्रपटानंतर अनीतचे नशीब फळफळले असून तिला एक मोठा बिगबजेट चित्रपट मिळाला आहे.
मॅडॉक फिल्म्सकडून सध्या अनेक चित्रपट निर्माण केले जात असून त्यांना प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसादही मिळत आहे. ‘थामा’नंतर मॅडॉक फिल्म्स आता ‘शक्तिशालिनी’ चित्रपट निर्माण करत असून यात अनीत पड्डा दिसून येणार आहे. या चित्रपटात अनीतची मुख्य भूमिका असणार आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
यापूर्वी या चित्रपटासाठी कियारा अडवाणीची निवड करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव तिला हा चित्रपट सोडावा लागला होता. आता अनीतची या चित्रपटात एंट्री झाली आहे. मॅडॉक फिल्म्सच्या प्रोजेक्टमध्ये संधी मिळाल्याने अनीतच्या कारकीर्दीला मोठा बूस्ट मिळणार आहे.