For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अँडी मरेला म्युनिच टेनिस स्पर्धा हुकणार

06:49 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
अँडी मरेला म्युनिच टेनिस स्पर्धा हुकणार
Advertisement

वृत्तसंस्था/ लंडन

Advertisement

ब्रिटनचा माजी टॉपसिडेड टेनिसपटू अँडी मरेला आगामी माँटे कार्लो आणि म्युनिच टेनिस स्पर्धा हुकणार आहे. मरेला अलिकडेच पुन्हा दुखापतीची समस्या जाणवत असल्याने तो या दोन स्पर्धांमध्ये खेळू शकणार नाही असे स्पर्धा आयोजकांनी सांगितले.

मरेच्या घोट्याला दुखापत झाली असून ती अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. मरेने यापूर्वी तीन वेळेला ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. मियामी टेनिस स्पर्धेत खेळताना गेल्या रविवारी 36 वर्षीय मरेला ही दुखापत झाली होती. या दुखापतीतून बरे होण्यासाठी त्याला कांही कालावधी लागेल. मियामी स्पर्धेत मरेला मॅचेककडून हार पत्करावी लागली होती. माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा 7 एप्रिलपासून तर बीएमडब्ल्यू खुली म्युनिच टेनिस स्पर्धा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात खेळविली जाणार आहे. या दोन्ही स्पर्धा हार्डकोर्टवरील आहेत. येत्या जुलै - ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या पॅरीस ऑलिंपिकसाठी ब्रिटनच्या संघामध्ये स्थान मिळेल, अशी आशा मरेने व्यक्त केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.