महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जोकोविचचा नवा प्रशिक्षक अँडी मरे

06:22 AM Nov 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सर्बियाचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू नोव्हॅक जोकोविचला ब्रिटनचा माजी टॉप सिडेड टेनिसपटू अँडी मरे प्रमुख प्रशिक्षक या नात्याने मार्गदर्शन करणार आहे. जोकोविचने मरेची प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे.

Advertisement

2025 च्या टेनिस हंगामाला ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेने जानेवारीत प्रारंभ होत आहे. या स्पर्धेपासून जोकोविचला अँडी मरेचे बहुमोल मार्गदर्शन लाभेल. जोकोविचने अलिकडेच प्रसार माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकनंतर ब्रिटनच्या अँडी मरेने टेनिस क्षेत्रातून निवृत्ती पत्करली. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत जोकोविचने सुवर्णपदक मिळविले होते. जागतिक टेनिस क्षेत्रामध्ये  बिग ‘फोर’ ओळखल्या जाणाऱ्या टेनिसपटूंमध्ये आता 37 वर्षीय जोकोविच हा एकमेव टेनिसपटू व्यवसायिक टेनिस क्षेत्रात वावरत आहे. स्पेनच्या राफेल नदालने गेल्याच आठवड्यात आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा केली होती. तर 2022 मध्ये स्विसच्या रॉजर फेडररने टेनिस क्षेत्राला निरोप दिला होता. ब्रिटनच्या माजी टॉप सिडेड अँडी मरेने आपल्या वैयक्तिक टेनिस कारकिर्दीत 3 ग्रँडस्लॅम स्पर्धा तसेच दुहेरी ऑलिम्पिक पदक मिळविले होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#SportNews
Next Article