राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत आंध्रप्रदेश विजेता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येथे झालेल्या 2025 च्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आंध्रप्रदेश एकूण सर्वाधिक 18 पदकांसह विजेतेपद पटकाविले. 2027 मध्ये होणाऱ्या खास ऑलिम्पिक विश्व उन्हाळी स्पर्धेच्या पूर्वतयारीकरिता ही स्पर्धा महत्त्वाची म्हणून ओळखली जाते.
या स्पर्धेमध्ये 20 राज्यांचे सुमारे 110 स्केटर्सनी सहभाग दर्शविला होता. त्यामध्ये 47 महिला आणि 63 पुरुषांचा समावेश होता. या स्पर्धेमध्ये आंध्रप्रदेशने 6 सुवर्ण, 5 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 18 पदके घेत सर्वंकश जेतेपद मिळविले. गोवा संघाने 4 सुवर्ण, 4 रौप्य आणि 7 कांस्य अशी एकूण 15 पदकांसह दुसरे स्थान, हरियाणाने 7 सुवर्ण, 5 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 15 पदकांसह तिसरे स्थान, गुजरातने 3 सुवर्ण, 5 रौप्य, 6 कांस्य अशी एकूण 14 पदके घेत चौथे स्थान, पंजाबने 6 सुवर्ण, 4 रौप्य, 3 कांस्य पदकांसह पाचवे स्थान, चंदीगडने 11 पदकांसह सहावे स्थान, दिल्लीने 6 सुवर्ण, 3 रौप्य आणि 2 कांस्य पदकांसह सातवे स्थान, हिमाचलप्रदेशने आठवे तर महाराष्ट्राने तीन सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्य पदकांसह नववे तर केरळने 8 पदकांसह दहावे स्थान घेतले.