आंध्रचा पंजाबवर 5 गड्यांनी विजय
वृत्तसंस्था/ पुणे
हेमंत रेड्डीच्या शानदार शतकाच्या जोरावर रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सय्यद मुस्ताक अली चषक टी-20 सुपर लीग अ गटातील सामन्यात आंध्र प्रदेशने पंजाबचा 5 गड्यांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबने 20 षटकात 5 बाद 205 धावा जमविल्या. त्यानंतर आंध्रने 19.5 षटकात 5 बाद 211 धावा जमवित हा सामना केवळ 1 चेंडू बाकी ठेऊन जिंकला. आंध्रचा युवा क्रिकेटपटू हेमंत रे•ाrचा हा दुसरा सामना आहे.
पंजाबच्या डावात हरनुर सिंगने 42, अनमोलप्रित सिंगने 47, सलील अरोराने 42 तर रमनदीप सिंगने 43 धावा जमविल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबच्या भेदक गोलंदाजीसमोर आंध्रची एकवेळी स्थिती 5 बाद 56 अशी केविलवानी झाली होती. पण त्यानंतर हेमंत रे•ाrने 7 षटकार आणि 11 चौकारांसह 53 चेंडूत नाबाद 109 धावांची खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. एस. डी. प्रसादने 35 चेंडूत नाबाद 53 धावा झळकाविल्या. रेड्डी आणि प्रसाद यांनी 6 व्या गड्यासाठी अभेद्य 155 धावांची शतकी भागिदारी केली. आंध्रचा कर्णधार रिकी भुई 15 धावांवर बाद झाला. हेब्बारने 4 तर एस. भरतने केवळ 1 धाव जमविली. पंजाब संघाला या स्पर्धेतील यापूर्वीच्या सामन्यात झारखंडकडून 6 गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे पंजाबचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पंजाबतर्फे गुरनूर ब्रारने 23 धावांत 3 गडी बाद केले. पंजाबच्या नितीश कुमारकडून पुन्हा निराशा झाली.
संक्षिप्त धावफलक - पंजाब 20 षटकात 5 बाद 205 (हरनुर सिंग 42, अनमोलप्रित सिंग 47, सलील अरोरा 42, रमनदीप सिंग 43), आंध्र प्रदेश 19.5 षटकात 5 बाद 211 (हेमंत रे•ाr नाबाद 109, एस. प्रसाद नाबाद 53, ब्रार 3-23).