For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन् थ्रिलसह परतणार जेंडाया

06:52 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
अन् थ्रिलसह परतणार जेंडाया
Advertisement

यूफोरिया 3 चा ट्रेलर सादर

Advertisement

जेंडायाला यूफोरिया या वेबसीरिजने 2 एमी अवॉर्ड्स एक क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड आणि एक गोल्डन ग्लोब मिळवून दिला आहे. या सीरिजच्या नव्या सीझनमधून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकण्यास हॉलिवूड अभिनेत्री सज्ज आहे. 4 वर्षांनी हॉलिवूड सीरिज यूफोरिया सीझन 3 प्रदर्शित होणार आहे. हा एक सायकोलॉजिकल ड्रामा असून यात जेंडायाने मुख्य भूमिका साकारली आहे. आता सीरिजमध्ये नव्या पैलूसह जेंडाया परतणार आहे. सीझन 3 चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून तो सस्पेंस, थ्रिल आणि अॅक्शनने भरपूर आहे.

सीझन 3 ची कहाणी जेंडाया आणि उर्वरित मुलांच्या एडल्टहुडच्या अवतीभवती घुटमळणारी आहे. यूफोरिया 3 च्या ट्रेलरची सुरुवात जेंडायापासून होते, जी हायस्कूल संपल्याच्या 5 वर्षांनी एका नव्या आयुष्याच्या अपेक्षेने वाटचाल करत असते. परंतु रेयोला (जेंडाया) आता देवावर विश्वास वाटू लागला आहे. रेयो नव्या आयुष्याची सुरुवात करू इच्छिते, परंतु हे तिच्यासाठी सोपे नसते. ड्रग डीलर लौरी धोकादायक लोकांसोबत रेयोच्या घराला वेढा घालत तिच्याकडे पैसे मागत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. तर केसी आणि नेटचे नातेही पूर्वीसारखे राहिलेले नसते.

Advertisement

यूफोरिया सीझन 3 एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. एचबीओ मॅक्सवर ही वेबसीरिज 12 एप्रिलपासून पाहता येणार आहे. या सीरिजमध्ये जेंडायासोबत शेरोन स्टोन, ट्रिशा पायटास, नताशा लियोन, डेनियल डेडवाइलर, एली रोथ, मार्शान लिंच, अडेवाले अकिनओये-अग्बाजे, टोबी वॉलेस, डॅरेल ब्रिट-गिब्सन, कदीम हार्डिसन, प्रिसिला डेलगाडो, जेम्स लँड्री हेबर्ट, अन्ना वॅन पॅटन, असांते ब्लॅक्क यासारखे कलाकार दिसून येणार आहेत.

Advertisement
Tags :

.