For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन् त्याने जीवनाचा केला अंत

03:59 PM Jun 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
अन् त्याने जीवनाचा केला अंत
Advertisement

कचरा प्रकरणावरुन तरुणाचा गेला बळी: म्हापसा येथील धक्कादायक दुर्दैवी घटना

Advertisement

म्हापसा : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर  व्हायरल झाल्यामुळे आणि याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड मानसिक तणावातून महाविद्यालयीन विद्यार्थ्याने स्वत:वर पिस्तुलाने गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना काल म्हापशात घडली. या प्रकाराने संपूर्ण गोवा हादरला आहे. म्हापसा येथील गावसावाडा परिसरात घडलेल्या या घटनेत सॅम्युअल गार्विन डी ब्रागांझा (23 वर्षे) या तऊणाचा अंत झाला. डिजिटल युगातील ट्रोलिंग, सामाजिक प्रतिष्ठा व अचानक उद्भवलेल्या कायदेशीर प्रक्रियेचा तऊण मनावर कसा विपरित परिणाम होऊ शकतो, हे या घटनेतून समोर आले असून ते अत्यंत चिंताजनक आहे.

आत्महत्येची घटना 5 जून रोजी मध्य रात्रीनंतर 12.40 वाजण्याच्या सुमारास घडली. सॅम्युअल याने घरातील बाथऊममध्ये स्वत:वर गोळी झाडून घेतली. रात्री अचानक गोळीबाराचा मोठा आवाज आल्याने घरातील सदस्यांनी सॅम्युअलच्या बेडरूमकडे धाव घेतली असता हा भयंकर प्रकार उघडकीस आला. तो बाथऊममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. कुटुंबीय त्याला तातडीने जिल्हा इस्पितळात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आत्महत्त्येची माहिती मिळाल्यानंतर म्हापसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्राथमिक पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला.

Advertisement

तक्रारदार, न्यूज चॅनेलसह पोलिसांवर कारवाई करावी- सॅम्युअलच्या आईची मागणी

सॅम्युअल याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर पोस्ट करून सॅम्युअल याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्या तक्रारदारावर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सॅम्युअलच्या कुटुंबियांनी केली आहे. गोव्यातील एका न्यूज  चॅनलने हा व्हिडीओ व्हायरल केल्याने आपल्या मुलाचा जीव गेल्याचे मयताच्या आईने म्हटले आहे. आपल्या मुलाच्या आत्महत्येस म्हापसा पोलिसही तेवढेच जबाबदार असल्याचे त्याच्या आईने म्हटले आहे. पोलिसांनी आपल्या मुलास सात तास कोंडून ठेवले, त्यातून आलेल्या मानसिक तणावातून त्याने आत्महत्या केली.  त्यामुळे पोलिसांवरही कठोर कारवाई व्हावी असे कुटुंबीयांनी म्हटले आहे. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी फॉरेन्सिक पथक येऊन घटनास्थळी तपासणी व पंचनामा केला. पोलिस अधीक्षक सलीम शेख, निरीक्षक नवीन देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान मयताचा मृतदेह गोमेकॉ शवागृहात ठेवण्यात आला असून शनिवारी सकाळी मृतदेह ताब्यात घ्यावा की नाही याबाबत फादर, ग्रामस्थ व कुटुंबीयांची बैठक होणार असून नंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती माजी नगरसेवक दीपक म्हाडेश्री यांनी दै. तऊण भारतशी बोलताना दिली.

Advertisement
Tags :

.