For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आणि ...शेवटी नियतीने न्याय केला!

06:04 AM Jul 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
आणि    शेवटी नियतीने न्याय केला
Advertisement

नियतीचा खेळ बघा. डब्ल्यूटीसी फायनल मध्ये भारताला उपविजेतेपदार समाधान मानावे लागले. त्यानंतर लगेच चार ते पाच महिन्यात नोव्हेंबर 2023 मध्ये एका पेक्षा एक सरस संघाला लोळवून सुद्धा झटपट क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात नशीब ऊसलं होत. परंतु पुढच्या सात महिन्यात भारताला हा सूर्य हा जयद्रथ करण्याची नामी संधी आली. काल ख्रया अर्थाने भारताची सत्वपरीक्षा होते. किंबहुना मी तर म्हणेन इथे खरी परीक्षा नियतीचीच होती. आणि..... शेवटी नियतीने न्याय केला!

Advertisement

काल माझ्या आयुष्यात 25 जून 1983, 24 सप्टेंबर 2007, दोन एप्रिल 2011 हे आनंददायी दिवस. जे क्रिकेट, किंबहुना ज्या क्रिकेटचे समालोचन माझ्यासाठी पॅशन आहे. किंबहुना याच क्रिकेट समालोचनाने भारतातील सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण सौरव गांगुली ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्राथ इंग्लंडच्या नासीर हुसेन च्या संघातील काही खेळाडू यांच्याबरोबर माझे  समलोचनातील गुऊ कै. वि. वि. करमरकर, चंद्रशेखर संत यांच्यासोबत ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन प्रत्यक्ष रूबरू करता आलं होतं. त्याच क्रिकेटने आणखीन काल एक सोनियाचा दिवस आणला.बार्बाडोस मैदानाच्या बाहेर वेसली हॉल आणि सर गारफील्ड सोबर्स यांचे पुतळे आहेत. काल ते जर साक्षात व्हीआयपी बॉक्समध्ये अवतरले असते तर ख्रया अर्थाने रोहितच्या पाठीवरती शाबासकीची थाप दिली असती. असोक

ढाल सामन्याची सुऊवात झकास झाली होती. नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागल्यानंतर हा t-20 चा सामना आहे की कसोटी सामना आहे हे पहिल्या षटकात कळलच नाही. पहिल्या षटकात क्रिकेटमधील तीन देखणे फटके बघायला मिळाले. जे मागील काही वर्षांपासून सामन्याच्या सुऊवातीच्या षटकात लोप पावताना दिसत होते. अर्थात हे फटके ख्रया अर्थाने क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करतात. पहिला स्क्वेअर ड्राईव्ह, दुसरा फ्लिक आणि तिसरा सुनील गावस्कर गुऊजींची आठवण करून देणारा स्ट्रेट ड्राईव्ह. पहिल्या षटकात धावांचा पाऊस पडल्यानंतर सुद्धा रोहितला व्रायाच्या विऊद्ध स्विपचा फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही. बरं ठपुढचा ठेच मागचा शहाणा ठहा वाक्प्रचार कदाचित ऋषभ पंत विसरला असावा. क्रिकेटमधील जो ठव्हीठएरिया आहे, त्या एरियात तो ख्रया अर्थाने छान खेळतो. किंबहुना मि तर म्हणे न तोच एरिया त्याची ख्रया अर्थाने स्ट्रेंथ आहे. बरं हा धोका दहाव्या षटकानंतर घेतला असता तर मी समजू शकलो असतो. परंतु डावाच्या दुस्रया षटकात अशाप्रकारे धोका तो ही विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, मन अगदी ख्रया अर्थाने सुन्न झालं होतं. बरं आल्या आल्या स्वीप वर हुकूमत गाजवण्या इतपत तुम्ही परिपक्व झालात का? तुम्ही म्हणजे इंग्लंडचा ग्रॅम गुच नव्हे. याच ग्राम गुचने 1987 च्या वर्ल्ड कप मध्ये मनिंदर सिंग आणि रवी शास्त्राr विऊद्ध 50 टक्के फटके स्वीप चे मारले होते.

Advertisement

परमेश्वराने आजचा सामना कदाचित विराट साठी राखून ठेवला असावा. मी पॉपिंग क्रीजचा राजा का आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. या विश्वचषक स्पर्धेत विराट वगळता बाकी सर्व फलंदाजांनी धावांच्या रूपात येथेच्छ ताव मारला होता. काल ती ही भूक विराटने मिटवली. बाद फेरीच्या सामन्यात जेवढा दबाव जास्त तेवढी माझी बॅट तळपते हे काल पुन्हा एकदा विराटने दाखवून दिले. जाता जाता फॉर्म इज टेम्पररी क्लास इज परमनंट हे ही तो गोलंदाजांच्या कानात पुटपुटला असावा. नॉक आउट  स्टेजमध्ये तुमचं टेम्परा मेन्ट ख्रया अर्थाने चेक केले जाते. त्यातही तो ब्रयापैकी उत्तीर्ण झाला. शेवटी ठटायगर अभी जिंदा हैठ म्हणत विराटने ख्रया अर्थाने भारताला सावरलं. 176 धावांचा पाठलाग करताना अर्शदीप ने ख्रया अर्थाने खिंडार पाडली. डेथओवर पाठोपाठ सुरवाती च्या षटकात सुद्धा मी चांगले हादरे देऊ शकतो हे त्यांनी काल दाखवून दिले. भारतीय गोलंदाजांची सुऊवात चांगली होऊन सुद्धा त्यावर नियंत्रण ठेवणे भारताला जमलं नाही. डीकॉक आणि क्लासेनने विश्वचषकात धोकेदायक ठरू पाहणारी मंदगती गोलंदाजी अगदी सर्वसाधारण करून टाकली. विशेषत: या दोघांनी अक्षर पटेलला क्लब दर्जाच्या क्रिकेटच्या गोलंदाजीच्या पंक्तीत जाऊन बसवलं. अक्षर पटेलने हिंदी चित्रपटातील तो डायलॉग सार्थ ठरवला एक हाथ से दे दुसरे हाथ से ले म्हणूत जितक्या धावा काढल्या तेवढ्या देऊन मोकळा झाला. परंतु पुन्हा एकदा हार्दिक पंड्याचं धावून आला. त्यानंतर ख्रया अर्थाने चमत्कार झाला. माझे आजोबा मला गमतीने नेहमी म्हणायचे नमस्कार त्यालाच कर जो चमत्कार दाखवेल. काल सूर्यकुमार यादव ने चमत्कार केला. काल त्या चमत्काराला ख्रया अर्थाने वाकून नमस्कार करावासा वाटला. 30 चेंडू 30 धावा असं साधं सोपं समीकरण असताना सुद्धा पुन्हा एकदा क्रिकेटने आपला रंग दाखवला. या क्रिकेटने अंतिम सामनाही सोडला नाही. किंबहुना मोठ्या इव्हेंट मधील क्रिकेटचा अंतिम सामना कसा असावा याच मूर्तीमंत उदाहरण काल आपल्याला बघायला मिळालं. काल क्षणभर मला अहमदाबादच्या त्या सामन्याची आठवण झाली, पुन्हा अंगावरती जखमा होणार या विचारातून मन अगदी कासावीस झालं होतं. परंतु पुन्हा एकदा बुमराहऊपी मलमा ने 140 कोटी भारतीयांच्या संभाव्य  जखमा दूर केल्या. क्रिकेटच्या खेळा मधून लाखो ऊपये मिळवण्राया खेळाडूंना ते सुख मिळत नव्हतं ज्याची ते मागील एक वर्षापासून अपेक्षा करत होते. सरते शेवटी ते सुख त्यांना मिळालंच. शेवटी युद्धात आणि खेळात ठ जो जीता वही सिकंदरठ असं म्हटलं जातं. अर्थात हे सिकंदर, ठमुकद्दर का सिकंदर ठहोतं का हे येणारा काळच ठरवणार आहे. जाता जाता मी एवढेच म्हणेन की नियतीने अखेर न्याय केलाच! तूर्तास तरी भारतीय संघाचे त्रिवार अभिनंदन!!! उद्याच्या शेवटच्या अंकात भारतीय प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या बद्दल बोलू.

Advertisement
Tags :

.