For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आंध्रप्रदेशात मिळालं शहामृगाचे प्राचीन घरटं

06:08 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
आंध्रप्रदेशात मिळालं शहामृगाचे प्राचीन घरटं
Advertisement

3500 हून अधिक अंड्यांचे तुकडेही हस्तगत

Advertisement

आंध्रप्रदेशात जगातील सर्वात जुने शहामृगाचे घरटे सापडेल आहेत. 41 हजार वर्षे जुन्या या घरट्याला आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या पथकाने प्रकाशम जिल्ह्यात शोधले आहे. जेथे हे घरटे आहे, ते ठिकाण प्राचीन जीवाश्मांचा खजिना आहे. शहामृगांच्या या घरट्याची रुंद सुमारे 9-10 फूट इतकी आहे.

या घरट्यात किती आकाराचे शहामृग किंवा तिचा परिवार राहत होता याचा अंदाज याद्वारे लावता येतो. तसेच अधिवासाची योग्य कल्पनाही करता येते. या घरट्याचा शोध वडोदरा येथील एमएस विद्यापीठाच्या पुरातत्व तज्ञांनी लावल आहे. याकरता जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी साथ दिली आहे.

Advertisement

हा शोध भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण ही एक मेगाफॉनल प्रजीत आहे. येथे आम्हाला शहामृगाच्या अंड्यांचे 3500 हून अधिक प्राचीन तुकडे मिळाले आहेत. म्हणजेच दक्षिण भारतात एकेकाळी शहामृगांचे अस्तित्व होते असे वक्तव्य एमएस विद्यापीठाच्या पुरातत्व अन् प्राचीन इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक देवारा अनिलकुमार यांनी केले आहे.

भारतीय खंडात शहामृग कुठून आले तसेच ते किती काळापर्यंत अस्तित्वात होते हे अध्ययनातून स्पष्ट होणार आहे. यापूर्वीच्या अध्ययनात शिवालिक हिल्स आणि खंडीय भारतात शहामृगांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत. हे पुरावे हजारो वर्षे जुने आहेत अशी माहिती देवारा यांनी दिली आहे. संबंधित अध्ययनाला लीकी फौंडेशनकडून निधी मिळाला होता. या प्राचीन पक्ष्याच्या अधिवासाविषयी वैज्ञानिकांनी जाणून घ्यावे यासाठी लीकी फौंडेशनने ही आर्थिक मदत केली होती.

Advertisement
Tags :

.