महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इजिप्तमध्ये आढळली अब्जाधीशांची प्राचीन दफनभूमी

06:22 AM Aug 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

63 मकबऱ्यांमध्ये भरले होते सोने

Advertisement

इजिप्त स्वत:च्या प्राचीन इतिहासासाठी ओळखला जातो. येथील जमिनीखाली हजारो वर्षे जुना इतिहास दडलेला आहे. इजिप्तच्या डेमिएटामध्ये सुरू असलेल्या उत्खननादरम्यान सोन्याच्या कलाकृती, नाणी आणि मातीच्या भांड्यांचा भांडार मिळाला आहे. याचबरोबर 2500 वर्षांपेक्षाही जुन्या 63 कब्र आढळून आल्या आहेत. इजिप्तच्या पर्यटन आणि पुरातन अवशेष मंत्रालयानुसार कलाकृती प्राचीन इजिप्तच्या संस्कृतीच्या रहस्यांशी निगडित माहिती देतात. यामुळे त्या काळातील दफन प्रथांसोबत प्राचीन विदेशी व्यापारात किनारी शहराच्या भूमिकेसंबंधी माहिती मिळते.

Advertisement

उत्खननादरम्यान 63 थडग्यांमध्ये अंत्यसंस्काराशी निगडित ताबीज मिळाली असून ती मृतांचे रक्षण करत असल्याचे मानले जायचे. याचबरोबर काही मूर्ती मिळाल्या असून त्या मृतांसोबत परलोकात नेण्यासाठी डिझाइन करण्यात आल्या होत्या. उत्खननादरम्यान कांस्याची 38 नाणी मिळाली असून ती एका चिनी मातीच्या फुलदाणीत ठेवण्यात आली होती. ही नाणी टॉलेमिक युगातील असून जो 323 ते 30 ख्रिस्तपूर्वपर्यंत द ग्रेट अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर शासन करणाऱ्या राजवंशांपैकी एक होता.

जेथे हा खजिना मिळाला आहे, त्याला ताल अल-दीर या नावाने ओळखले जाते. हा शब्द प्राचीन शहराच्या विस्तृत दफनभूमीसाठी वापरला जातो. मंत्रालयानुसार दफनभूमी 26 व्या राजवंशादरम्यान वेशेष स्वरुपात महत्त्वपूर्ण होती, परंतु रोमन  आणि बाइजेंटाइन युगादरम्यान देखील ती वापरात होती. कैरोमध्ये अमेरिका विद्यापीठातील प्राध्यापक सलीमा इकराम यांनी कलाकृती इजिप्तच्या इतिहासाविषयी खूप मोठी माहिती प्रदान करत असल्याचे सांगितले आहे.

वस्तूंचे प्रकार, विशेषकरून सोन्याच्या ताबीजच्या आधारावर हे एक समृद्ध दफनभूमी होती हे बोलले जाऊ शकते आणि जाहीरपणे याच्याशी निगडित शहरात समाजाचे अनेक स्तर राहिले असतील असे इकराम यांनी नमूद केले आहे. ताल अल दीरमध्ये पुरातत्वतज्ञांना एक मोठा मकबरा मिळाला होता, ज्यात उच्च सामाजिक स्थिती असलेल्या लोकांना दफन करण्यात आले होते. मृतदेहांना सोन्याच्या पानांच्या आकृतींसोबत दफन करण्यात आले होते असे पर्यटन मंत्रालयाने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article