उद्योजक आणासाहेब चकोते संत गाडगे महाराज समाजभुषण पुरस्काने सन्मानित
नांदणी /वार्ताहर
संत गाडगे महाराज अध्यासन, कोल्हापूर यांचे मार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा संत गाडगे महाराज समाजभुषण पुरस्कार चकोते ग्रुपचे चेअरमन, उद्योजक आण्णासाहेब चकोते यांना जेष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. चंद्रकुमार नलगे यांचे शुभहस्ते प्रदान करण्यात आला शाल, श्रीफळ, मान पत्र व शिल्ड असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणूण माजी सनदी अधिकारी मा. इंद्रजित देशमुख हे उपस्थित होते. यावेळी यावर्षीपासून दिला जाणारा प्राचार्य रा.तु. भगत जिवनगौरव पुरस्कार भारती विद्यापिठाचे कुलपती प्रा. डॉ. शिवाजीराव कदम याना प्रदान करणेत आला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे भाषा भवन मध्ये झालेल्या सोहळ्यात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून बोलताना इंद्रजित देशमुख यांनी आण्णासाहेबाच्या या उद्योगातील यशस्वी वाटचालीचा गौरव केला व त्यांच्या उद्यमशिलतेचे कौतुक केले. स्वतः मी महाराष्ट्र राज्यात व इतर ठिकाणी फिरत असताना 'चकोते उत्पादने " सर्वत्र उपलब्ध आहेत. व तेही अत्यंत रुचकर व दर्जेदार आहेत असे गौरव उदगार काढले यावेळी प्रा. डॉ. शिवाजीराव कदम यांनी 'चकोते यांनी अत्यंत कमी वयामध्ये इतकी मोठी बेकरी इंडस्ट्रीज निर्माण केली व तरुणांना प्रेरणा दिली असून त्यांची वाटचाल आदर्शवत आहे असे कौतुक केले.
यावेळी बोलताना आण्णासाहेब चकोते यांनी फक्त पैसा मिळविणे हा उद्देश नसुन आपल्या उद्योगातून जवळ जवळ ३००० चुली पेटल्या आहेत. व हजारो लोकांना यातून रोजगार उपलब्ध करुन दिल्याचे समाधान फार मोठे आहे. अशी भावना व्यक्त करुन 'संत गाडगे महाराज समाज भुषण पुरस्काराने केलेला गौरव म्हणजे येथून पुढे याही पेक्षा मोठे सामाजीक कार्य आपल्या हातून घडवि अशी मनोकामना व्यकत केली.
महाराष्ट्र, कर्नाटक या भागात 24 मार्च 2015 रोजी वाढदिवसाच्या निमीत्ताने एकाच दिवशी व एकाच वेळी 300 बसस्थानकाची स्वच्छता व रंगरंगोटी करून स्वच्छता अभियान पूर्ण करून केले आहे. व याची दखल लिम्का बुक ऑफ वर्ड रेकार्ड मध्ये झाली असल्याचे सांगून संत गाडगे महाराज यांचे नावे मिळालेल्या समाजभुषण पुरस्काराने धन्य झालो अशी कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यीक प्रा. डॉ. चंद्रकुमार नालगे यांनी उद्योजक आण्णासाहेब चकोते व प्रा. शिवाजीराव कदम यांचे अभिनंदन करून संत गाडगे महाराज व कै. रा. तु. भगत त्यांच्या कार्याचा आढावा घेवून त्यांच्या बद्दलच्या अनेक आठवणी यावेळी उपस्थितांना सांगीतल्या, करवीर साहित्य परिषद व संत गाडगे महाराज अध्यासन कोल्हापूर यांचे मार्फत साहित्य क्षेत्रातील विविध लेखक व कविना साहित्य पुरस्कार देवून गौरव केला.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एस. एन. पाटील यांनी केले, पाहुण्यांचा परिचय जॉर्ज क्रुज यांनी करून दिला तर मानपत्राचे वाचन प्रा. डॉ. सरोज बिडकर यांनी केले आभार प्रदर्शन एम.डी देसाई यांनी केला. कार्यक्रमास जेष्ठ इतिहास अभ्यासक प्रा. जयसिंगराव पवार, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. योगेश साबळे, कै. रा.तु. भगत यांचे सर्व कुटुंबिय, डॉ. एम. बी. शेख, भारती विद्यापीठाचे प्रा. एच. एम. कदम सर, शिवाजी विद्यापीठातील विविध विभागातील पदाधिकारी, प्राध्यापक वर्ग व साहित्य क्षेत्रातील अनेक साहित्यीक, लेखक, कवी मोठ्या संखेने उपस्थित होते.