अक्षयसोबत अनन्याची जोडी
बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमारची कारकीर्द पुन्हा एकदा रुळावर येताना दिसून येत आहे. त्याच्या स्काय फोर्स या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. आता एका ऐतिहासिक ड्रामापटासोबत अक्षय पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अनन्या पांडे ही अभिनेत्री दिसून येणार आहे.
‘केसरी चॅप्टर 2’ या चित्रपटात अक्षयसोबत अनन्या ही झळकणार आहे. यापुर्वी प्रदर्शित केसरी हा चित्रपट ऐतिहासिक घटनेवर आधारित होता. ज्यात स्वतंत्र भारतापूर्वी शिखांच्या बलिदानाविषयीची कहाणी दर्शविण्यात आली होती. अक्षय कुमार पुन्हा एकदा स्वातंत्र्यसेनानीची भूमिका साकारणार आहे.
सी. शंकर नायर या स्वातंत्र्यसेनानीवर आधारित हा चित्रपट असणार आहे. जालियांवाला बाग हत्याप्रकरणातील पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिले होते. हा चित्रपट रघु पलात अन् पुष्पा पलात यांचे पुस्तक ‘द केस दॅट शुक द एम्पायर’वर आधारित असेल. हा एक कोर्टरुम ड्रामा असेल. या चित्रपटात आर. माधवन देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट चालू वर्षातच प्रदर्शित होणार असल्याचे समजते. अक्षयसोबत अनन्या दिसून येणार असल्याने तिचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असणार आहेत.