कॅटरिना कैफसोबत झळकणार अनन्या
अभिनेत्री कॅटरिना कैफ सध्या स्वत:च्या मातृत्वाचा आनंद घेत असून अभिनयापासून दूर आहे. परंतु पॅटरिना पुढील काळात एका चित्रपटात काम करणार असून हा एका जुन्या चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री अनन्या पांडे ही कॅटरिना कैफसोबत झळकणार आहे.
कोरियाग्राफर अणि दिग्दर्शिका फराह खानचा ‘तीस मार खां’ हा चित्रपट फारसा चालला नव्हता. परंतु या चित्रपटाने तेव्हा 65 कोटी रुपये कमाविले होते, असा दावा ती करते. जेन-जीसाठी हा एक कल्ट फिल्म आहे. इंटरनेट मीडियावर जेन-जीकडून ‘तीस मार खां पार्ट 2’ ची मागणी केली जात असल्याचे फराह खानचे सांगणे आहे. फराहकडून या चित्रपटाचा सीक्वेल तयार केला जाईल याची कुठलीच अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. परंतु अनन्या पांडे आणि फराह खान यांच्यात यासंबंधी बोलणे झाल्याचे समोर आले आहे.
अभिनेता विक्की कौशलची पत्नी कॅटरिना कैफ सध्या मातृत्वाच्या काळाचा आनंद घेत आहे. यामुळे कॅटरिना आणखी काही महिने पॅमेऱ्यापासून दूर राहण्याची शक्यता आहे. अशास्थितीत ‘तीस मार खां’ चित्रपटाचा सीक्वेल तयार करण्याचे ठरल्यास तो पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत फ्लोरवर जाण्याची शक्यता नाही.