अनन्या पांडेने गमविला मोठा चित्रपट
अभिनेत्री अनन्या पांडे सध्या स्वत:चा आगामी चित्रपट ‘तू मेरी मैं तेरा’ वरून चर्चेत आहे. या चित्रपटात ती कार्तिक आर्यनसोबत मुख्य भूमिकेत आहे. याचबरोबर ती ‘चांद मेरा दिल’मध्ये लक्ष्य लालवानीसोबत दिसून येणार आहे. एकीकडे अभिनेत्रीकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत, तर एका महत्त्वाच्या चित्रपटातून तिला वगळण्यात आले आहे. अमृता शेरगिलच्या बायोपिकमध्ये अनन्या दिसून येणार होती, परंतु आता तिच्या जागी नव्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. अनन्याच्या जागी तान्या मानिकतलाला निवडण्यात आल्याचे समजते. तान्याने ‘ए सूटेबल बॉय’ आणि ‘किल’मधील स्वत:च्या अभिनयाने लक्ष वेधून घेतले होते. याचबरोबर ती राजकुमार रावसोबत एका चित्रपटात दिसून येणार आहे. राजकुमारसोबत काम करण्याचा अनुभव अत्यंत वेगळा आहे. माझ्यासोबत असे घडतेय हे स्वीकारण्यास मला वेळ लागत आहे. मी कारकीर्दीसाठी मोठी मेहनत केली आहे. याचमुळे समोर आलेल्या संधींसाठी मी तयार असल्याचा आनंद असल्याचे उद्गार तान्याने काढले आहेत.