कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वॉकर ब्लांकोला डेट करतेय अनन्या

06:29 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अनन्या पांडे स्वत:च्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफवरून अधिक चर्चेत असते. आदित्य रॉय कपूरसोबत ब्रेकअप झाल्यावर अभिनेत्रीचे नाव क्रिकेटपटू हार्दिक पांड्यासोबत जोडले जात होते. दोघांनाही अनंत अंबानी आणि राधिक मर्चंटच्या विवाहसोहळ्यात एकत्र नाचगाण्याचा आनंद घेताना पाहिले गेले होते. परंतु आता अभिनेत्री अन्य कुणाच्या तरी प्रेमात पडल्याचे समोर आले आहे. मॉडेल वॉकर ब्लांकोला अनन्या डेट करत असल्याची चर्चा आहे.

Advertisement

Advertisement

अनन्याची वॉकरसोबतची पहिली भेट अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्यादरम्यान क्रूज पार्टीत झाली होती. अनन्या आणि वॉकर यांच्यात उत्तम बाँडिंग तयार झाले आहे. सध्या दोघेही एकमेकांना अधिक जाणून घेत आहेत. अनन्याने वॉकरला इन्स्टाग्रामवर फॉलो करणे सुरू केले आहे. वॉकर हा जामनगर येथे राहतो आणि वंतारा अॅनिमल पार्कमध्ये अंबानी समुहासाठी काम करतो. यापूर्वी अनन्याचे एक छायाचित्र व्हायरल झाले होते, ज्यात तिने एडब्ल्यू असा उल्लेख असलेले पेंडेंट घातल्याचे दिसून आले होते.  तिच्या चाहत्यांना आता डब्ल्यू नेमका कोण याचा उलगडा झाला आहे.

अनन्या पांडे यापूर्वी खो गए हम कहां या चित्रपटात दिसून आली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यात तिच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदी आणि आदर्श गौरव हे कलाकार दिसून आले होते. तर पुढील काळात ती कॉल मी बे या वेबसीरिजमध्ये दिसून येणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article