‘ओके जानू’च्या सीक्वेलसाठी अनन्या इच्छुक
आदित्य रॉय कपूरसोबत काम करण्याची तयारी
अनन्या पांडेचा ‘खो गए हम कहां’ हा चित्रपट अलिकडेच ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात तिने साकारलेली ही अहाना ही भूमिका प्रेक्षकांना पसंत पडली आहे. अनन्या याचबरोबर स्वत:च्या खासगी आयुष्यावरून चर्चेत आहे. अनन्या आणि आदित्य रॉय कपूर हे रिलेशनशिपमध्ये असल्याचे मानले जाते. अनन्याने आता आदित्य रॉय कपूरसोबत ‘ओके जानू’ या चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आदित्यला या चित्रपटाचे चित्रिकरण करताना अत्यंत मजा वाटली असणार, कारण तो अत्यंत रोमँटिक चित्रपट आहे. आता ‘ओके जानू’सारखे हलकेफुलके रोमँटिक चित्रपट निर्माण होत नसल्याचे अनन्याने सांगितले आहे.
मी अत्यंत पझेसिव्ह गर्लफ्रेंड आहे. याचबरोबर अत्यंत प्रोटेक्टिव्ह देखील आहे. मी ज्याच्यावर प्रेम करते, त्याच्यासोबत विवाह करू इच्छिते असे तिचे सांगणे आहे. 2023 हे वर्ष अनन्यासाठी चांगले ठरले होते. मागील वर्षी तिचे ‘ड्रीम गर्ल 2’ आणि ‘खो गए हम कहां’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते, या दोन्ही चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळाली होती. अनन्या आगामी काळात ‘कंट्रोल’ आणि ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ सी शंकरन नायर’ या चित्रपटांमध्ये दिसून येणार आहे.