कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अनंत सिंह यांचे न्यायालयासमोर आत्मसमर्पण

06:05 AM Jan 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बिहारमधील बाहुबली नेते : पोलीस होते अटकेच्या तयारीत

Advertisement

वृत्तसंस्था/ पाटणा

Advertisement

बिहारच्या मोकामा येथील गोळीबारप्रकरणी माजी आमदार अन् बाहुबली नेते अनंत सिंह यांनी शुक्रवारी आत्मसमर्पण केले आहे. तर त्यापूर्वी पोलीस अनंत सिंह यांना अटक करण्याच्या तयारीत होते. तर सर्वांना चकित करत अनंत सिंह यांनी बाढ न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आहे. यावेळी न्यायालयासमोर बाहुबली नेत्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.

मोकामा गोळीबार प्रकरणी पोलिसांनी अनंत सिंह यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्यासमवेत अन्य कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे. याचबरोबर अनंत सिंह यांच्यावर पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करणे, गैरवर्तन आणि शासकीय कामात अडथळा आणण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी विरोधी पक्षांनी नितीश कुमार सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

बाहुबली अनंत सिंह पूर्वी मोकामा गोळीबार प्रकरणातील आरोपी सोनू सिंहने पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती. सोनूच्या विरोधात मारहाण करणे अन् गोळीबाराचा आरोप आहे. पोलीस आता सोनूची चौकशी करत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी अनंत सिंह यांचे समर्थक रोशन सिंहला अटक केली आहे.

पंचमहला पोलीस स्थानकाच्या हद्दीतील नौरंगा गावात माजी आमदाराचे समर्थक अन् गँगस्टर सोनू-मोनू यांच्याकडून परस्परांवर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराच्या घटनेवेळी अनंत सिंह तेथे उपस्थित होते. या घटनेनंतर परिसरात दहशत निर्माण झाली असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article