For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनंत अंबानी यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्ती

07:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
अनंत अंबानी यांची कार्यकारी संचालकपदी नियुक्ती
Advertisement

नवी दिल्ली : मुकेश अंबानी यांचे सुपुत्र अनंत अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीजच्या कार्यकारी संचालकपदी निवड करण्यात आली आहे. एक तारखेपासून ते आपल्या पदावरती रुजू झाले असून त्यांची नियुक्ती पाच वर्षांकरिता असणार आहे. संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.  1 मे पासून ते आपल्या पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. ऑगस्ट 2023 मध्ये प्रसिद्धा उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या तीन मुलांना मंडळावरती समाविष्ट केले आहे. ईशा, आकाश आणि अनंत या तिघांना संचालक मंडळावर घेतलेले असून मुकेश अंबानी यांनी अनंत यांना तेल ते दूरसंचार या उद्योगावरती बिगर कार्यकारी संचालक म्हणून घेतले होते.

Advertisement

पुढील पिढीही सक्रीय

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून मानले जात असून आपल्या पुढील पिढीला ते या क्षेत्रामध्ये अधिक सक्रिय करू पाहत आहेत. जिओ इन्फोकॉमचे नेतृत्व आकाश अंबानी हे सांभाळत असून ईशा अंबानी या रिटेल क्षेत्राची जबाबदारी पाहत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.