कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल संघटना अध्यक्षपदी आनंद गवस

11:34 AM Dec 10, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम पटेल, सचिवपदी मंदार प्रभू,
तर खजिनदारपदी अवधूत साळगावकर

Advertisement

प्रतिनिधी
बांदा

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्हा सॉ मिल संघटनेची वार्षिक सभा शिवराज मराठा माध्यमिक विद्यालय साळगाव येथे रविवारी संपन्न झाली. यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड केली. यामध्ये अध्यक्षपदी आनंद विष्णु गवस, रा. बांदा यांची उपाध्यक्षपदी पुरुषोत्तम देवजी पटेल रा. कुडाळ, सचिव मंदार प्रभू रा. कुडाळ,खजिनदारपदी अवधूत सतीश साळगावकर. रा. साळगाव यांची निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्वांनी नवीन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या. येत्या काळात संघटनेच्या हितासाठी मी काम करेन असे प्रतिपादन अध्यक्ष आनंद गवस यांनी केले.दरम्यान कार्यकारणी सदस्यपदी वासुदेव रामचंद्र नाईक रा. दोडामार्ग, संदीप अरविंद पटेल रा. कड़ावल, महेश नारायण पटेल रा. सावंतवाड़ी, काशीनाथ सतीश दुभाषी रा. सावंतवाड़ी, दयानंद शेणवी रा. वेंगुर्ला, संजय पटेल रा. मालवण, नितिन पांडुरंग दळवी रा. कुडाळ, सुमित पटेल रा. मालवण,किशोर पटेल रा. कणकवली, कांतिभाई पटेल रा. कणकवली, रामदास दळवी रा. कुडाळ, सदाशिव परशुराम आळवे, रा. कुडाळ, गणेश माधव रा. कुडाळ यांची निवड करण्यात आली.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update# konkan update# Anand Gavas appointed as president of Sindhudurg District Saw Mill Association#
Next Article