For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोटरी क्लब वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी आनंद बोवलेकर

04:53 PM Jun 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
रोटरी क्लब वेंगुर्लेच्या अध्यक्षपदी आनंद बोवलेकर
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-
रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊन च्या २०२५ -२६ या वर्षासाठी क्लबचे नवीन अध्यक्ष म्हणून रोटरियन आनंद बोवलेकर, सचिव पदी रोटरीन डॉ. राजेश्वर उबाळे व खजिनदारपदी रो. अनमोल गिरप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नूतन कार्यकरणीचा पदग्रहण सोहळा बुधवार दिनांक २५ जून २०२५ रोजी साई डीलक्स हॉल वेंगुर्ला येथे संध्याकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला असून सर्वांनी यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन रोटरी क्लबचे मावळते अध्यक्ष योगेश नाईक यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले.यावेळी बोलताना नूतन सचिव डॉ. राजेश्वर उबाळे म्हणाले, २५ रोजी होणाऱ्या पदग्रहण सोहळ्याला असिस्टंट कोऑर्डीनेटर एन्ड पोलिओ झोन ७ चे नासिरभाई बोरसादवाला व डॉ. प्रशांत कोलते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तसेच या सोहळ्याला जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातील ११ प्रेसिडेंट उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. नूतन अध्यक्ष आनंद बोवलेकर म्हणाले, या पदग्रहण सोहळ्यात रोटरी क्लबच्या सदस्यांच्या पाल्यांचा तसेच तालुक्यातील शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत, गरजू विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच रक्तदान क्षेत्रात बहुमोल असे कार्य करत अनेकांचे प्राण वाचवण्याऱ्या जय सुनील मांजरेकर, ग्रामीण रुग्णालयात काम करणाऱ्या आरोग्य सेविका विनिता वासुदेव तांडेल, २०२६ पासून वायरमन म्हणून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या विशाल मंगेश चेंदवणकर, चार्मिंग मिस इंडिया 'किताब पडकवणाऱ्या किरण शरद मेस्त्री व प्रसिद्ध शरीर सौष्ठवपटू मंगेश गावडे यांचा विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी बोलताना मावळते प्रेसिडेंट योगेश नाईक यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या विविध सामाजिक कामांची माहिती दिली. ते म्हणाले, मागच्या वर्षी १५०० वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे वाटप जिल्ह्यातील गरजू शेतकऱ्यांना करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा बॅडमिंटन लीग या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. डॉ गद्रे नेत्र रुगणालाय आयकेसर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिरे व शस्त्रक्रिया कॅम्प, संजीवनी हॉस्पिटलमध्ये मूळव्याध व मोफत उपचार शिबिर, प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप, महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी व उपचार शिबिर असे विविध उपक्रम घेतले. तसेच हुबळी रोटरी क्रिकेट लीग मध्ये उपविजेते पद पटकावले. जिल्हा रोटरी स्पोर्ट्स मध्ये विविध खेळात २० मेडल्स मिळवली. तसेच या वर्षात विविध रोटरी पुरस्कार या क्लब ने प्राप्त केले. तसेच नूतन कार्यालयाचाही शुभारंभ २०२४ मध्ये करण्यात आला. रोटरीचे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल यावर्षी रोटरी इंटरनॅशनल एक्सलन्स (सायटेशन ) पुरस्कार वेंगुर्ला रोटरी क्लबला जाहीर झाला आहे. तसेच यावर्षी क्लब मधील १२ रोटरीयन्सना "पॉल हॅरीस फेलो" या सन्मानाने गौरविण्यात आले असल्याची माहिती मावळते प्रेसिडेंट योगेश नाईक आणि सेक्रेटरी प्रथमेश नाईक यांनी देत नूतन पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.