For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आनंद अकादमीचा विजयी प्रारंभ

06:02 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
आनंद अकादमीचा विजयी प्रारंभ
Advertisement

4 टायगर चषक 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

आनंद क्रिकेट अकादमी आयोजित 12 वर्षांखालील टायगर चषक निमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत आनंद अकादमीने गोपाल स्पोर्ट्स बेंगळूर संघाचा 9 गड्यांनी पराभव करुन विजयी सलामी दिली. श्लोक चडीचाल याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement

भुतरामहट्टी येथील भगवान महावीर मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात गोपाल स्पोर्ट्स बेंगळूर संघाने प्रथम फलंदाजी करताना 27.3 षटकात सर्वगडी बाद 120 धावा केल्या. त्यात अवनिश अभिषेकने 3 चौकारांसह 31, अक्षता सतीशकुमारने 2 चौकारांसह 17 धावा केल्या. आनंदतर्फे चैतन अनगोळकर व अविश उपालदिनी यांनी प्रत्येकी 2 तर श्लोक चडीचालने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 17 षटकात 1 गडी बाद 121 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. श्लोक चडीचालने 8 चौकारांसह 54 चेंडूत नाबाद 58 तर विश्रुत कुंदरनाडने 7 चौकारांसह 49 धावा केल्या. मान्यवरांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

Advertisement
Tags :

.