For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आनंद अकादमी 218 धावांनी विजयी

10:50 AM May 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
आनंद अकादमी 218 धावांनी विजयी
Advertisement

बेळगाव : पॅंथर क्रिकेट क्लब बेंगळूर आयोजित टायगर चषक निमंत्रितांच्या 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमीने इस्टवेस्ट सेंटर संघाचा 218 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. जीवा गौडरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भुतरामहट्टी येथील भगवान महावीर मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आनंद अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 4 गडी बाद 251 धावा केल्या. त्यात जीवा गौडरने 8 चौकारासह नाबाद 60, श्लोक चडीचालने 10 चौकारासह 60, स्वराज्य गोवेकरने 5 चौकारासह 37 तर विश्ा़dरुत पुंदरनाडने 5 चौकारासह 30 धावा केल्या. इस्टवेस्टतर्फे अंश यादवने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना इस्टवेस्ट सेंटरचा डाव 12.4 षटकात 33 धावांत आटोपला. त्यात लिशानने 3 चौकारांसह 14 धावा केल्या. आनंदतर्फे रौनक खन्नुकरने 3, आरुष जंगीने 2 गडी बाद केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.