महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आनंद अकादमीकडे लिटल चॅम्पियन चषक

10:22 AM May 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : धारवाड येथील एसडीएम क्रिकेट अकॅडमी धारवाड आयोजित 13 वर्षाखालील लिटल चॅलेंजर चषक आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आनंद अकादमीने श्री दुर्गा स्पोर्ट्स अकादमीचा 79 धावांनी पराभव करून लिटल चॅलेंजर चषक पटकाविला. अष्टपैलू खेळाडू अद्वैत चव्हाणला मालिकावीरांने गौरविण्यात आले. धारवाड येथे घेण्यात आलेल्या लिटल चॅलेंज चषक क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात  आनंद अकादमीने एचसीए हुबळी संघाचा 130 गावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना आनंद अकादमीने 30 षटकात 6 गडी बाद 198 धावा केल्या. त्यात  अद्वैत चव्हाणने 98, ओजस गडकरीने 35 धावा केल्या. एससीए तर्फे क्रियान जैनने 36 धावात 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरा दाखल खेळताना हुबळी क्रिकेट अकादमीचा डाव  20.1  षटकात 64 धावात आटोपला. त्यात साई वाणीकरने 30 धावा केल्या. आनंदतर्फे अंशने 8 धावा 4, श्लोक चडीचालने 2 धावात 2, अद्वेत चव्हाणने 16 धावा 2 गडीबात केले. दुसरा उपांत्य फेरीच्या सामन्यात  श्री दुर्गा स्पोर्ट्स क्लब हुबळीने बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाचा 33 धावानी पराभव केला.

Advertisement

श्री दुर्गा स्पोर्टस क्लबने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात एक गडी बाद 194 धावा केल्या. त्याला उत्तरदेताना बेळगाव स्पोर्ट्स क्लब डाव 24.3 षटकात सर्व गडी बाद 161 धावात आटोपला. अंतिम सामन्यात आनंद अकादमीने 30 षटकात 6 गडी बाद  215 धावा केल्या. त्यात अद्वैत चव्हाणने 12 चौकारासह 136 धावा करून शतक जळकवले. प्रत्युत्तरादाखल खेळताना दुर्गा स्पोर्ट्स क्लबचा डाव 28.1 षटकात 136 गारद झाला. त्यात कर्णधार मुगाबिसने 6 चौकारोसह 50 तर प्रणव जे. ने 34 धावा केल्या. आंनद तर्फे अद्वैsत चव्हाणने 19 धावा 4 गडी बाद केले. श्लोक चडीचालने प्रभावी गोलंदाजी केली. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे अंधार कुमार यांच्या हस्ते विजेत्या आनंद अकादमीला व उपविजेत्या श्री दुर्गा स्पोर्ट्स क्लब संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तर उत्कृष्ट फलंदाज प्रविण जे. (दुर्गा स्पोर्ट्स), उत्कृष्ट गोलंदाज अनिश व्ही. (आनंद), उत्कृष्ट यष्टीरक्षक ओजस गडकरी तर मालिकावीर म्हणून अद्वेद चव्हाण यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article