बी डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत आनंद अकादमी उपविजेता
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त, धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए बी डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत बेळगावच्या आनंद क्रिकेट अकादमीने शेवटच्या साखळी सामन्यात सीसीके संघाचा पराभव करुन विजय मिळवित स्पर्धेतील उपविजेतेपद मिळविले. शेवटच्या साखळी सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी बाद 266 धावा केल्या. त्यात उत्तम दत्ताने 60, सुजय पाटील 49, अद्वैत साठे 47 तर लाभ वेर्णेकरने 41 धावा केल्या. सीसीकेतर्फे संपतकुमारने 3 तर लिखित बन्नूर व संकेत नायक प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीसीकेचा डाव 39.2 षटकात 183 धावांत आटोपला. दिवाकर शंकरने 73, संपतकुमार भवरने 28 धावा केल्या. आनंदतर्फे जिशानअली सय्यदने 4, संजय पाटील व अद्वैत साठे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. या सामन्यात 83 धावांनी विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेत बी डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. या सामन्यात उत्तम दत्ताला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.