महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आनंद अकादमी, बेळगाव स्पोर्ट्स क्लब विजयी

10:04 AM Jan 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केएससीए सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धा : नागेंद्र पाटीलचे दमदार शतक

Advertisement

बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित सेकंड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटका हुबळीचा 142 धावांनी तर आनंद क्रिकेट अकादमीचा 146 धावांनी पराभव करून प्रत्येकी 4 गुण मिळविले. शतकवीर नागेंद्र पाटील (आनंद आकदमी), अर्णव नुगानट्टी (बेळगाव स्पोर्ट्स क्लब) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. ऑटोनगर बेळगावच्या केएससीए मैदानावर खेळविण्यात आलेल्या सामन्यात आनंद अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी बाद 296 धावा केल्या. त्यात सलामवीर नागेंद्र पाटीलने 1 षटकार व 21 चौकारांसह 121 धावा करून दमदार शतक झळकवले. त्याला झिशानअलीने 4 षटकार व 9 चौकारांसह 86, सिद्धार्थ करडीने 4 चौकारांसह 23, केतज कोल्हापूरेने 14 धावा केल्या. नीनातर्फे अंगदराज हित्तलमनी व नवीन शिरगाम यांनी प्रत्येकी 2 तर आकाश सुद, माजिद मकानदार, स्वरुप साळुंखे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement

प्रत्युत्तरादाखल खेळताना नीना स्पोर्ट्स क्लबचा डाव 42 षटकात सर्व गडी बाद 150 धावांत आटोपला. त्यात शोहब मन्नूरवालेने 5 चौकारांसह 35, माजिद मकानदारने 1 षटकार व 2 चौकारांसह 23, शिवकुमार पुणेदने 19, स्वरुप साळुंखेने 14, अंजुम मोरबने 13, मदन चडीचालने 11 धावा केल्या. आनंदतर्फे नागेंद्र पाटीलने 13 धावांत 3, नंदकुमार मलतवाडने 18 धावांत 3, आदित्य पाटीलने 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 40.4 षटकात सर्व गडी बाद 288 धावा केल्या. त्यात अर्णव लुगानटीने 4 षटकार व 9 चौकारांसह 87, दर्शन मयेकरने 3 षटकार, 5 चौकारांसह 50, ध्रुव देसाईने 6 चौकारांसह 36, शिवम नेसरीकरने 1 षटकार, 3 चौकारांसह 28, केदार उसूलकरने 5 चौकारांसह 26 तर आदित्य वारंगने 15 धावा केल्या. क्रिकेट क्लब कर्नाटकतर्फे आदर्श नाईकने 39 धावात 5, ओमकार देशपांडेने 58 धावात 3 तर तेजस व अथर्व यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक संघाचा डाव 39.1 षटकात सर्व गडी बाद 161 धावांत आटोपला. त्यात तेजस मुर्डेश्वरने 1 षटकार, 4 चौकारांसह 49, राजा इराणीने 2 चौकारांसह 26, संकेत नायरने 18, आदित्य शाणबाग व शिवनगौडा पाटील यांनी प्रत्येकी 15 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे आदित्य वारंग, आकाश असलकर, बाबू कदम यांनी प्रत्येकी 2 तर प्रथमेश मास्तमर्डी, ध्रुव देसाई व शिवम नेसरीकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article