For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनाहत सिंग उपांत्य फेरीत

06:45 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनाहत सिंग उपांत्य फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम

Advertisement

येथे सुरू असलेल्या 19 वर्षांखालील वयोगटातील ब्रिटीश खुल्या आंतरराष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धेत भारताची महिला स्क्वॅशपटू अनाहत सिंगने उपांत्य फेरीत प्रवेश मिळविताना इजिप्तच्या बार्ब सामेहचा पराभव केला.

भारताच्या टॉपसिडेड अनाहत सिंगने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत इजिप्तच्या सामेहचा 11-4, 10-12, 11-9, 11-3 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळाले. आता अनाहत सिंगचा उपांत्य फेरीचा सामना इजिप्तच्या मलिका अल केरेस्कायशी होणार आहे. या स्पर्धेत दिल्लीच्या अनाहत सिंगने इजिप्तच्या अलमॅरेगीचा तसेच हाँगकाँगच्या विंग हो यांचा पराभव करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे. या स्पर्धेत अनाहत सिंगला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. या स्पर्धेत मुलांच्या 17 वर्षांखालील वयोगटात भारताच्या द्वितीय माकांकीत आर्यवीर दिवानने उपांत्य फेरी गाठताना इजिप्तच्या यासीन कोरीतेमचा 9-11, 11-3, 10-12, 11-9, 12-10 अशा गेम्समध्ये फडशा पाडला.

Advertisement

Advertisement
Tags :

.