अनाहत सिंग उपांत्यपूर्व फेरीत
06:14 AM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, टोरँटो
Advertisement
येथे सुरू असलेल्या कॅनेडियन महिलांच्या खुल्या स्क्वॅश स्पर्धेत भारताची 15 वी मानांकित अनाहत सिंगने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना इंग्लंडच्या सॅरेन निगमचा पराभव केला.
अनाहत सिंगने इंग्लंडची विद्यमान विश्व कनिष्ठ स्पर्धेतील विजेती सॅरेनचा 11-6, 4-11, 11-5, 11-7 अशा गेम्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. या स्पर्धेत अनाहत सिंगला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या सिलीकॉन व्हॅली खुल्या स्क्वॅश स्पर्धेत अनाहत सिंगने उपांत्य फेरी गाठली होती. कॅनडातील या स्पर्धेत अनाहत सिंगचा पुढील सामना इजिप्तच्या सातव्या मानांकित अबोलीखेरशी होणार आहे. मात्र पुरुषांच्या विभागात भारताच्या वीर छोत्रानीला इजिप्तच्या शोरबॅगीकडून दुसऱ्या फेरीतच 11-7, 11-7, 11-6 अशी हार पत्करावी लागली.
Advertisement
Advertisement
