25 डिसेंबरला परतणार ‘एनाकोंडा’
हॉलिवूडच्या बहुचर्चित चित्रपटामध्ये ‘एनाकोंडा’चे नाव सामील आहे. 90 च्या दशकापासून 2000 च्या दशकापर्यंत या फ्रेंचाइजीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन पेले आहे. आता पूर्वीपेक्षा अधिक रोमांचासह एनाकोंडा परतणार आहे. हॉलिवूड सुपरस्टार पॉल रड आणि जॅक ब्लॅक ही जोडी चालू वर्षात एनाकोंडाला नव्या शैलीत सादर करण्यास सज्ज आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आहे. अॅडव्हेंचर थ्रिलरच्या स्वरुपात एनाकोंडा चित्रपट प्रत्येकाच्या आवडीचा मानला जातो. सोनी पिक्चर एंटरटेन्मेटकडून याचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून यात पॉल रड आणि जॅक ब्लॅकची जोडी एनाकेंडावर एक माहितीपट तयार करण्याची योजना आखताना दिसून येतात. याकरता ते दोघे आणि त्यांची टीम जंगलात पोहोचते. परंतु या धोकादायक शिकारीचा सामना करावा लागल्यावर काय घडते हे चित्रपटात पाहता येणार आहे.
या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शन टॉम गोर्मिकन यांनी केले आहे. हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. भारतीय प्रेक्षकांसाठी एनाकोंडा फ्रेंचाइजी नेहमीच मनोरंजनाचे सर्वात चांगले साधन राहिले आहे, अशास्थितीत या चित्रपटात भारतात चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे.